IND vs ENG: चौथ्या कसोटीत जो रूट भारतीय संघासाठी धोकादायक! पहा काय सांगतेय आकडेवारी

भारत वि इंग्लंड चौथी कसोटी: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या मैदानावर खेळला जाईल. पण भारतासाठी आता हा कसोटी सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. कारण भारत मालिकेत 1-2 अशा पिछाडीवर आहे. भारताने सामना जिंकल्यास मालिका रोमांचक होईल. तर इंग्लंडने सामना जिंकल्यास मालिकेचा निकाल लागेल. अशा परिस्थितीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे. या सामन्यात या दोघांना जो रूटचा विकेट शोधावी लागेल, कारण या मैदानावर त्याचा रेकाॅर्ड खूपच शानदार राहिला आहे. (Manchester Test match)

मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळला जाईल. जिथे इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज जो रूटने 11 कसोटी सामन्यांच्या 19 डावांमध्ये 65.20च्या सरासरीने 978 धावा केल्या आहेत. या दरम्यान रूटने 7 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. या मैदानावर रूटची सर्वोच्च धावसंख्या 254 आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, मँचेस्टरमध्ये फलंदाजी करणे रूटला खूप आवडते. कोणत्याही एका मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये जो रूटची सर्वाधिक सरासरी मँचेस्टरमध्येच आहे. अशा परिस्थितीत भारतीय गोलंदाजांना चौथ्या कसोटीत पूर्वीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करावी लागेल. रूटची बॅट चालल्यास सामना भारतीय संघाच्या हातातून खूप दूर जाऊ शकतो. (Joe Root Manchester record)

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 मध्ये जो रूटने 3 सामन्यांच्या 6 डावांमध्ये 50.60च्या सरासरीने 253 धावा केल्या आहेत. ज्यात 1 शतक आणि 1 अर्धशतक देखील समाविष्ट आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रूटला भारतीय संघाविरुद्ध खेळणे खूप आवडते. अशा परिस्थितीत त्याची मोठी धावसंख्या इंग्लंड संघाला आणखी मजबूत करेल. रूट अपयशी ठरल्यासच इंग्लंड संघावर दबाव वाढेल. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहला पुन्हा एकदा या स्टार फलंदाजाविरुद्ध ‘मास्टरप्लान’ तयार करावा लागेल. (Joe Root Anderson Tendulkar Trophy)

Comments are closed.