IND vs ENG: इंग्लंड दौऱ्याला मिळाला ICCचा दर्जा, लॉर्ड्सचा दबदबा संपुष्टात!

गेल्या मालिकेत दोन्ही संघांनी शानदार खेळ दाखवत मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली (IND vs ENG Test Series). हे 5 सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळवण्यात आले होते. आता ICCने भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 4 सामन्यांच्या खेळपट्टी आणि आऊटफिल्डचे रेटिंग जाहीर केले आहे. या निर्णयामुळे ICCने लॉर्ड्सचा दबदबा संपवला आहे.

भारत-इंग्लंड मालिकेतील पहिल्या 4 सामन्यांसाठी वापरलेल्या खेळपट्टीचे रेटिंग ICCने जाहीर केले. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावरील खेळपट्टीला सर्वोत्कृष्ट मानांकन मिळाले. त्यानंतर एजबेस्टन, लॉर्ड्स ओल्ड ट्रॅफर्ड येथील खेळपट्टींना समाधानकारक असे रेटिंग देण्यात आले. मालिकेतील पाचवा सामना ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला होता, मात्र या सामन्याच्या खेळपट्टीचे रेटिंग अद्याप जाहीर झालेले नाही.

भारत-इंग्लंड (IND vs ENG) मालिकेचा पहिला सामना हेडिंग्ले येथे झाला आणि हा सामना इंग्लंडने 5 विकेटने जिंकला. दुसऱ्या सामन्यात एजबेस्टन येथे भारतीय संघाने 336 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरा सामना लॉर्ड्स येथे झाला, जिथे इंग्लंडने 22 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. चौथा सामना मॅन्चेस्टर येथे झाला आणि तो सामना ड्रॉ झाला. अखेरचा सामना ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला आणि भारताने शानदार गोलंदाजीच्या जोरावर 6 धावांनी विजय मिळवला.

ICCने जाहीर केलेले रेटिंग:

हेडिंग्ले, लीड्स खूप चांगली, खूप चांगली
एजबेस्टन, बर्मिंघम, खूप चांगली
लॉर्ड्स, लंडन, समाधानकारक, खूप चांगली
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅन्चेस्टर समाधानकारक,खूप चांगली

Comments are closed.