आकाशदीपचे इंग्लंडला सलग दोन धक्के, डकेट आणि पोप तंबूत परतले
England vs India Test Day 2 : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कुठवर मजल मारणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवशी भारताने 5 बाद 310 धावांवरुन सुरुवात केली. कर्णधार शुभमन गिल 269 आणि रवींद्र जडेजा 89 धावा केल्या आहेत. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 203 धावांची भागीदारी केली आहे. शुभमन गिलनं रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर सोबत भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरनं 42 धावा केल्या.
Comments are closed.