बटलरने इंग्लिश संघाचे नेतृत्व सोडले

हिंदुस्थान विरुद्धच्या मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतही आलेले अपयश इंग्लंडचा कर्णधार जॉश बटलरच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाद झाल्यानंतर बटलरने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या इंग्लंड आणि दक्षिण आप्रैका यांच्या होणारा सामना हा बटलरचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असेल. गेल्या काही आयसीसी स्पर्धांमध्ये इंग्लंडची कामगिरी निराशाजनक झाली आहे. हिंदुस्थानात झालेल्या विश्वचषकात इंग्लंडवर साखळी फेरीतच बाद होण्याची नामुष्की ओढवली होती. त्यातच आता पाकिस्तानात सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्याने या स्पर्धेतील इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे सततच्या अपयशामुळे निराश झालेल्या कर्णधार बटरलने कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शुक्रवारी त्याने घोषणा देखील केली.

Comments are closed.