T20WC2026: इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं! ‘हे’ 4 संघ सेमीफायनलच्या शर्यतीत आघाडीवर, 3 सामने ठरणार निर्णायक

2026 च्या टी-20 विश्वचषकात (icc T20 international world cup 2026) सध्या सुपर-8 फेरीचे सामने सुरू असून, प्रत्येक सामन्यासोबत रोमांच आणि अनिश्चितता वाढत आहे. रविवारी पल्लेकल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यजमान श्रीलंका आणि गतविजेता इंग्लंड (Shrilanka vs England) यांच्यात असाच एक धक्कादायक सामना पाहायला मिळाला. पहिल्या डावात इंग्लंडने 9 गडी गमावून 146 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या 95 धावांत गारद होईल आणि आपल्याच घरच्या मैदानात 51 धावांनी पराभूत होईल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती.

इंग्लंडच्या या विजयामुळे आता उपांत्य फेरीची (Semi-final) शर्यत अधिकच रंजक झाली आहे. अपेक्षेउलट झालेल्या या पराभवामुळे श्रीलंका संघ आता दबावाखाली आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सामन्याच्या निकालापूर्वीची स्थिती पाहता भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ सध्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. दोन्ही ग्रुपमधील अव्वल 2 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

जरी सध्या चार संघ शर्यतीत पुढे असले, तरी काही आगामी सामने या समीकरणांमध्ये मोठे बदल घडवू शकतात.

23 फेब्रुवारी: झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज
24 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
25 फेब्रुवारी: श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड

पल्लेकलमधील श्रीलंकेच्या पराभवानंतर दोन्ही ग्रुपमधील स्थिती बदलली आहे. आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यानंतर यामध्ये काय बदल होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.