हैदराबादमध्ये इनडोअर स्कायडायव्हिंगचा आनंद घ्या
काही रुपयांमध्ये पूर्ण होणार अॅडव्हेंचरचा छंद
जर तुम्हालाही स्कायडायव्हिंगचा आनंद घ्यायचा असेल आणि तुम्हाला याचा छंद असेल तर हैदराबादच्या गांदीपेट भागात देशातील पहिला इनडोअर स्कायडायव्हिंग सुरू झाले आहे. तसेच सुरक्षित पद्धतीने मजेशीर वातावरणात स्कायडायव्हिंगचा अनुभव येथे घेता येणार आहे.
हे भारतातील पहिले इनडोअर स्कायडायव्हिंग आहे. ग्रॅविटीजिपमध्ये विमानातून उडी घेत स्कायडायव्हिंग करावे लागत नाही तसेच येथे कुठलाही पॅराशूट नसतो. हे एक इनडोअर स्कायडायव्हिंग असुन तेथे एक काचेचा ग्रॅव्हिटी झोन तयार करण्यात आला आहे. याच्या आत हवेच्या मदतीने स्कायडायव्हिंगचा आनंद घेता येईल अशाप्रकारचे वातावरण तयार केले जाते.
आम्ही प्रत्येकासाठी उड्डाण करण्याच्या स्वप्नाला साकार करू इच्छितो. स्कायडायव्हिंग अत्यंत महाग असून बहुतांश लोकांकडे प्रशिक्षण आणि अनुभव नसतो. अशा स्थितीत आम्ही त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी इनडोअर स्कायडायव्हिंग करवितो, जो 40 मिनिटांपर्यंत चालतो असे ग्रॅविटीजिपचे सुशील यांनी सांगितले.
हैदराबादमधील आउटर रिंग रोडवरून येथपर्यंत जाता येते. किंवा हैदराबादमधून बस किंवा ऑटो तसेच खासगी वाहनाने सहजपणे तेथे पोहोचता येते. इनडोअर स्कायडायव्हिंगसाठी 2000-3000 रुपयांचे शुल्क आकारले जाते आणि ते दुपारी 12.30 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत खुले असते.
Comments are closed.