‘छावा’ने ‘पठाण’ला लोळवले! 30 दिवसांत चित्रपटाची छप्परफाड कमाई

‘शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है’.. ‘छावा’ चित्रपटातील या संवादाने वास्तवामध्ये स्वतःच्या अस्तित्वाची डरकाळी फोडली आहे. ‘छावा’ प्रदर्शित होऊन 30 दिवसांचा काळ लोटला, या दिवसांमध्ये ‘छावा’ने छप्परफाड कमाई करत तिकीटबारीवर चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं म्हणत ‘छावा’ अजूनही तिकीटबारीवर राज्य करताना दिसतोय.
केवळ तिकीटबारीच नाही तर, किंग खानच्या ‘पठाण’लाही ‘छावा’चा पंजा चांगलाच भारी पडला आहे. सध्याच्या घडीला ‘छावा’ने देशांतर्गत 600 कोटींची कमाई करत किंग खानच्या ‘पठाण’ला मागे टाकले आहे. चित्रपटाच्या जगभरातील कमाईवर नजर टाकल्यास सध्याच्या घडीला 750 कोटींची कमाई करत छावाने सर्वांना सळो की पळो करून सोडले आहे.
सुमारे 130 कोटींची बजेट असलेल्या छावाने केवळ तीन दिवसातच चित्रपटाच्या बजेटची रक्कम वसूल केली होती. ब्लॉकबस्टर हिट ‘छावा’ मधील विकी कौशलच्या अभिनयाने 2025 मध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधील हा चित्रपट टर्निंग पॉईंट ठरला आहे.
Comments are closed.