पहिल्याच निवडणुकीत थलापतींचा मोठा ‘विजय’; रुमर्ड गर्लफ्रेंड तृषाला राहवेना, लागलीच घरी पोहोचली

त्रिशा विजय राजकीय पक्ष TVK चे समर्थन करते: तामिळानाडूच्या (Tamilnadu) राजकारणात आज महत्त्वाचा दिवस. मुख्यमंत्री नेमका कोणत्या पक्षाचा होणार, याचं चित्र आजच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. सध्या अभिनेत्यापासून राजकीय कारकि‍र्दीत स्वत:ची ओळख निर्माण करणारे TVK पक्षाचे सर्वेसर्वा विजय थलापती यांची बरीच चर्चा रंगली आहे. विजय यांनी ‘तामिळगा वेत्री कळघम’ (Thalapathy Vijay) या पक्षातून जनतेच्या मनात खास घर तयार केलं. DMK आणि AIADMK यांसारखे तळागाळातील पक्षांच्या बरोबरीने निवडणूक लढत आहे.  विशेष म्हणजे तामिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल करणारे ते एकमेव राजकारणी ठरले आहेत. दरम्यान, सध्या मतांचा कल हा त्यांच्या TVK पक्षाच्या बाजूने दिसत आहे. TVK पक्ष आघाडीवर आहे.

तृषा कृष्णन विजय थलापतीच्या घरी पोहोचली, कारण काय? (Trisha supporting Vijay political party TVK)

गेल्या काही महिन्यांपासून विजय थलापती यांच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा रंगली.   विजय थलापती यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिनं अभिनेत्यावर गंभीर आरोप केले होते. विजय यांचे एका महिलेशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं आरोप करत चेंगलपट्टू  फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली. यामुळे दोघांचा 27 वर्षांचा संसार चर्चेत आला होता.  यानंतर विजय थलापती आणि तृषा कृष्णन (Trisha Krishnan) या दोघांच्या नात्याची बरीच चर्चा रंगली.  दोघेही बऱ्याचदा एकत्र स्पॉट झाले.

अभिनेत्याच्या पत्नीने आरोप केल्यानंतर विजय आणि तृषा कृष्णन हे दोघेही एका लग्नात स्पॉट झाले. त्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं. दरम्यान, विजय थलापती यांची रुमर्ड गर्लफ्रेंड तृषा कृष्णन हिचा सकाळपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिनेत्री तिरुपतीला गेली होती.  व्यंकटेश्वर स्वामी यांच्या चरणी लीन झाली. आज तिचा वाढदिवस.   तिनं तिरुपतीला जात असताना व्हिडीओ इन्स्टाग्रमवर शेअर केला होता.

वाढदिवसानिमित्त अभिनेत्री मंदिरात गेली होती, असं काहींचं म्हणणं आहे. पण काहींनी TVK पक्षाच्या विजयासाठी, अभिनेत्री मंदिरात गेली होती का?  असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत  अभिनेत्री तृषा कृष्णन टीव्हीके पक्षाचे सर्वेसर्वा विजय थलापती यांच्या घराबाहेर स्पॉट झाली.  अभिनेत्री आपल्या चारचाकीमध्ये बसून थलापती विजय यांच्या निवासस्थानी असलेल्या गेटमधून आत शिरली.  सुरक्षा बंदोबस्त असल्यामुळे गेट बंद करण्यात आला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.