हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड महिका शर्माकडे गूड न्यूज; पोस्ट शेअर करत म्हणाली…
हार्दिक पांड्यास गर्लफ्रेंड महीका शर्मा: टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Star All-Rounder Hardik Pandya) नेहमीच त्याच्या ब्लॉकबस्टर खेळीमुळे चर्चेत असतो. पण, गेल्या काही दिवसांपासून हार्दिकच्या चर्चा रंगलेल्या त्या त्याच्या रुमर्ड गर्लफ्रेंडमुळे. हार्दिक पांड्या तसा आधीपासूनच त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्याची घटस्फोटीत पत्नी नताशा स्टॅनकोविकशीपासून (Natasa Stankovic)वेगळं झाल्यानंतर, बराच काळ हार्दिक सिंगल दिसत होता. पण अखेर हार्दिक पांड्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आणि त्या सर्व चर्चांना दुजोरा देणारे फोटो आणि व्हिडीओही समोर आले.
हार्दिक आता मुव्हऑन झाला असून तो त्याची नवी प्रेयसी महिका शर्मासोबत (Mahieka Sharma) दिसला आहे. हो, हार्दिक पांड्या आणि मॉडेल महिका शर्मा डेटिंग करत असल्याचं बोललं जात आहे. हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा अनेकदा एकत्र स्पॉट झालेले, पण सध्या त्यांना एकमेकांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून दोघेही रिलेशनमध्ये असल्याचं स्पष्ट होतंय. पण, आता लवकरच हार्दिक पांड्याची रुमर्ड गर्लफ्रेंड गूड न्यूज देणार असल्याचं बोलंल जातंय. याबाबत स्वतः महिकानंच खुलासा केला आहे.
माहिका शर्माकडे गूड न्यूज
हार्दिक पंड्या आणि माहिका शर्मा सध्या व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. मालदीवमधील त्यांच्या रोमँटिक व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये, दोघे एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत. दरम्यान, माहिरानं तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. माहिकानं तिच्या मैत्रिणीची एक स्टोरी पुन्हा शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये, माहिकाच्या मैत्रिणीनं सांगितलंय की, तिला दिल्लीतील लॅक्मे फॅशन वीक दरम्यान महिकाला खूप मिस केलं.
खरं तर, माहिका शर्मा यावर्षी दिल्लीतील लॅक्मे फॅशन वीकला अनुपस्थित होती. याबद्दल, तिच्या मैत्रिणीनं लिहिलंय की, “या सीझनमध्ये मला तुझी खूप आठवण आली, पण मी नेहमीच या अनाउन्समेंटची वाट पाहत होते…” माहिका शर्मानं तिच्या मैत्रिणीची इंस्टाग्राम स्टोरी पुन्हा शेअर करत लिहिलंय की, “अरे, तो किती गोंडस आहे… मी तुम्हाला लवकरच भेटेन, आणि माझ्यावर विश्वास ठेव, तुझं हे वाट पाहणं व्यर्थ जाणार नाही…” आता माहिकाचं वक्तव्य नेमकं काय सांगू इच्छित आहे? ती खरोखरच हार्दिक पांड्याशी लग्न करणार आहे का? की आणखी काही चालू आहे…? अशा चर्चा रंगल्या आहेत.
हार्दिक पंड्यासोबत माहिकाचं रोमँटिक व्हेकेशन
हार्दिक पंड्यानं जेव्हापासून महिकासोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे, तेव्हापासूनच दोघेही चर्चेत आहेत. ते एकत्र डिनर डेटवर जाताना अनेकदा स्पॉट झालेत, विमानतळावर एकत्र दिसलेत आणि आता ते मालदीवमध्येही एकत्र आहेत. दोघेही त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करत आहेत. एका फोटोमध्ये माहिका आणि हार्दिक हात धरून असल्याचं दिसून येतंय. हार्दिक पंड्याची प्रेयसी, माहिका शर्मा, एक मॉडेल आहे आणि सोशल मीडियावर फॅशन कंटेंट शेअर करत असते.
दरम्यान, माहिका शर्मापूर्वी हार्दिकचे इतर अनेक महिलांशी नाव जोडलं गेलेलं. अलिकडेच, हार्दिक पंड्या गायिका जास्मिन वालियाला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या अफवा फक्त अफवाच राहिल्या… हार्दिकनं 2018 मध्ये नताशा स्टॅन्कोविकला डेट करायला सुरुवात केली. यानंतर हार्दिकनं 2019 मध्ये नताशाला प्रपोज केलं आणि त्यानंतर दोघांनीही 2020 मध्ये लग्न केलं, परंतु लग्नानंतर फक्त चारच वर्षांत, 2024 मध्येच ते वेगळे झाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.