स्मृती-पलाशच्या नात्यात विष कालवणारी Mary D’Costa कोण? लग्नाच्या आदल्या रात्री रंगेहाथ सापडली?


मेरी डी'कोस्टा कोण आहे?: क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palaash Muchhal) दोघेही वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 23 नोव्हेंबर 2025 ला होणारी ग्रँड वेडिंग अचानक पुढे ढकलण्यात आली. ज्यामुळे दोघांच्या नात्यात आलेल्या एका वादळाबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले. या प्रकरणात आता एका व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. ती म्हणजे, कोरिओग्राफर मेरी डि’कोस्टा. असं सांगितलं जातंय की, पलाश मु्च्छलच्या चॅट्सचे जे स्क्रिन शॉर्ट्स व्हायरल होत आहेत, त्यामधील मुलगी म्हणजे, कोरिओग्राफर मेरी डि’कोस्टा. ही नेमकी आहे कोण? पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाच्या लग्नाला (Smriti Mandhana Palaash Muchhal Wedding)  लागलेलं ग्रहण हिच्यामुळेच तर लागलं नाही ना? अशा चर्चा रंगल्या आहेत.

पलाश मुच्छाळ, स्मृतींच्या आठवणीने कनाचे लग्न रद्द झाले नाही? (मुखल स्मृती मॅडंडिंग कॅन्डिंग कॅन्डिंग का आहे?

सुरुवातीला स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाचं लग्न रद्द झाल्याचं सांगितलं जात होतं. पण, त्यानंतर जे कारण समोर आलं ते खरोखरंच धक्कादायक होतं. पलाश मुच्छलची तब्येत बिघडल्यामुळे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पलाशची बहिण आणि सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलनंही स्मृतीचे वडील आजारी असल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलेलं. पण, आता या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे होत आहेत. ज्यामुळे लग्न रद्द होण्याचं कारण स्मृतीच्या वडिलांची तब्येत नसून पलाशचे इंटरनेटवर व्हायरल झालेले चॅट्स असल्याचं बोललं जातंय.

पलाशवर स्मृतीला धोका दिल्याचा आरोप (Palash Cheated With Smriti)

पलाश मुच्छलवर फसवणूकीचे गंभीर आरोप लावण्यात आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण वादग्रस्त बनलंय आणि मेरी डि’कोस्टा नावाच्या महिलेनं त्याच्यासोबतच्या तिच्या कथित फ्लर्टी चॅट्सचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. व्हायरल झालेल्या चॅट्सनुसार, पलाश मेरीला भेटण्याचा आग्रह धरत आहे. मेरीनं त्याला स्मृतीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल विचारलं असता, पलाश त्यांना ‘मृत’ आणि ‘लाँग डिस्टन्स’ रिलेशनशिप म्हणून वर्णन करतो. बॉलिवूड लाईफनं या स्क्रीनशॉट्सची पुष्टी केलेली नसली तरी, ते सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत.

पलाशचे फ्लर्टी चॅट्स लीक करणारी मेरी डि’कोस्टा कोण? (Who Is Mary D’Costa?)

आता, फ्लर्टी चॅट्स लीक करणारी व्यक्ती मेरी डि’कोस्टाबद्दल माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्क्रीनशॉट व्हायरल करणारी महिला ही एक कोरिओग्राफर असल्याचं सांगितलं जातंय, जी पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाच्या लग्नाच्या तयारीत सहभागी होती. दोघांच्या संगीतच्या डान्सची कोरिओग्राफी मेरी डि’कोस्टा हिनंच केलेली.

रेडिटवर लावले जातायत गंभीर आरोप

रेडिटवरील काही युजर्सनी आरोप केलाय की, स्मृतीच्या वडिलांनी लग्नापूर्वीच्या सोहळ्यांमध्ये मेरी डि’कोस्टासोबत पाहिलेलं. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. यामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, असं दावे नंतर रेटिड पोस्टमधून काढण्यात आले. अद्याप या दाव्यांवर कुटुंबातील कुणीच अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Smriti Mandhana Palash Muchhal: स्मृती मानधना त्याच्यासाठी पहिली नव्हती किंवा शेवटचीही नव्हती, प्लेबॉय इमेज असलेल्या पलाश मुच्छल आतापर्यंत किती मुलींवर भाळला, कोणाकोणाला केलंय डेट?

आणखी वाचा

Comments are closed.