7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, याच आठवड्यात बैठक

नवी  दिल्ली :एम्पलॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनकडून 7 कोटी खातेधारकांना या आठवड्यात व्याजदराची घोषणा करत दिलासा दिला जाऊ शकते. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक 28 फेब्रुवारीला होणार आहे. या बैठकीत आर्थिक वर्ष 2024-25 साठी ईपीएफओकडून खातेधारकांना दिल्या जाणाऱ्या व्याजाची घोषणा केली जाऊ शकते. 2023-24 मध्ये खातेधारकांना 8.25 टक्के व्याज दिलं होतं. 

श्रम आणि रोजगारमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल बोर्ड ऑफ ट्र्स्टीजची बैठक होणार आहे. या बैठकीत ईपीएफओकडून व्याजदराची घोषणा केली जाऊ शकते. सीबीटीनं व्याजदराला मान्यता दिल्यानंतर तो प्रस्ताव अर्थमंत्रालयाला पाठवण्यात येईल. वित्त मंत्रालयाकडून  मंजुरी दिल्यानंतर खातेधारकांना व्याज दिलं जाईल.  आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये  ईपीएफ खातेधारकांना 8.25 टक्के व्याज मिळालं होतं.  2022-23 मध्ये 8.15 टक्के आणि 2021-22 मध्ये 8.10 टक्के व्याज मिळालं होतं. ईपीएफओनं केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्यानं ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दिलं जाऊ शकते. 

खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना ईपीएफओमध्ये त्यांच्या पगारातील ठराविक रक्कम जमा करावी लागते. कर्मचारी ज्या संस्थेत काम करत असतात त्यांच्याकडून देखील ईपीएफ आणि पेन्शन म्हणून गुंतवणूक केली जाते. कर्मचाऱ्याची नोकरी जाणे, घर खरेदी, लग्न, मुलांचं शिक्षण आणि निवृत्ती अशा काळात पीएफमधून पैसे काढता येऊ शकतात. 

ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून गुंतवणुकीवर व्याज देण्यासंदर्भात इंटरेस्ट स्टॅबलायझेशन राखीव फंड निर्मितीवर चर्चा केली जाऊ शकते. हा फंड स्थापन केल्यानंतर ईपीएफओ 7 कोटींपेक्षा अधिक खातेधारकांना प्रॉविडंट फंडमधील रकमेवर निश्चित रिटर्न दिला जाऊ शकतो. यामुळं व्याज दरात चढ उतार किंवा ईपीएफओला गुंतवणुकीवर कमी परतावा दिला गेल्यास निश्चित परतावा दिला जाऊ शकतो. 

ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून या योजनेला मंजुरी मिळाल्यास 2026-27 पासून लागू केलं जाऊ शकतं. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजमध्ये केंद्रीय श्रम मंत्र्यांसह कामगार संघटनांचे प्रतिनिधी असतात. 

ईपीएफओ खातेधारकांना अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या काळात ईपीएफओ 3.0 लागू होणार आहे. खातेधारकांना स्मार्ट कार्ड दिलं जाईल. त्याद्वारे ते त्यावरुन पैसे काढू शकतात. याशिवाय यूपीआयवरुन देखील रक्कम काढण्यासंदर्भात मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. 

इतर बातम्या : 

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/photo-gallery/business/ntpc-gre-Share-by-8-rupees- ferter-in-period-end- ipo-listing-1345937">NTPC Green Share : लॉक इन कालावधी संपताच एनटीपीसी ग्रीनचा शेअर गडगडला, किती रुपयांवर पोहोचला?

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/photo-gallery/business/pm-kisan-samman-nidhi-scheme-18th-installment-release-today-9-core-70-70 लाख-शेती-जीईटी -2000-नाडी- 1345915">PM Kisan : 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 येणार, नरेंद्र मोदी पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करणार, 21000 कोटी पाठवणार

Comments are closed.