कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशननं बुधवारी एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी सोडल्यानंतर 75 टक्के रक्कम काढू शकतो. याशिवाय संपूर्ण रक्कम एक वर्षासाठी बेरोजगार राहिल्यास काढू शकतो, असं स्पष्टीकरण दिलं.

ईपीएफओनं एखादा कर्मचारी बेरोजगार राहिल्यास प्रीमॅच्युअर फायनल सेटलमेंटचा कालावधी 2 महिन्यांवरुन 12 महिने करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय पूर्ण पेन्शन काढण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता. या निर्णयावरुन सोशल मीडियावरुन ईपीएफओवर टीकेची झोड उठवण्यात आली होती.

एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेल्यानंतर तो 75 टक्के रक्कम पीएफ मधून काढू शकतो. तर, 12 महिने बेरोजगार राहिल्यास 100 टक्के रक्कम एका वर्षानंतर काढता येईल. नोकरीमधील खंडामुळं अनेकदा पैसे काढले जातात, अनेकदा पेन्शनची प्रकरण नाकारली जातात, असं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयानं म्हटलं.

या तरतुदीमुळं कर्मचाऱ्यांना सेवेतील सलगतेची हमी मिळेल. याशिवाय फायनल सेटलमेंट आणि कुटुंबियांची वित्तीय सुरक्षितता निश्चित होईल, असं देखील सांगण्यात आलं आहे.

ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्र्स्टीजकडून 238 व्या बैठकीत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये आजारपण, शिक्षण आणि लग्न यांचा समावेश आहे.
येथे प्रकाशितः 15 ऑक्टोबर 2025 11:20 पंतप्रधान (आयएसटी)
Comments are closed.