तुमच्या पीएफ खात्यात किती रुपये जमा?  या मार्गांनी काही मिनिटात कळेल किती रक्कम शिल्लक…

नवी दिल्ली : देशातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ईपीएफओच्या माध्यमातून उघडली जातात. पीएफ खातं एखाद्या बचत खात्याप्रमाण काम करतं. यामध्ये कर्मचाऱ्याच्या दरमहा वेतनातून एक ठराविक रक्कम कपात करुन पीएफ खात्यात जमा केली जाते. कंपनीकडून देखील रक्कम पीएफ खातं आणि पेन्शन खात्यात जमा केली जाते. दरमहा जमा केलेल्या रकमेतून मोठा फंड तयार होते. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यात आतापर्यंत किती रुपये जमा झाले आहेत हे माहिती नसतं. पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, हे काही मिनिटांमध्ये समजू शकतं.

वेबसाइटवरुन शिल्लक रक्कम तपासणं

जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासायची असेल तर सर्वात सोपा मार्ग ईपीएफओची वेबसाईट  https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/login यावर लॉगीन करुन शिल्लक तपासू शकता. यासाठी यूएएन क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक आहे.  या पोर्टलवर लॉगीन केल्यानंतर आमच्या सेवा सेक्शनमध्ये मेंबर पासबूक पर्याय निवडावा लागेल, तिथं तुमची सर्व माहिती मिळेल. तुमच्या खात्यात किती रक्कम जमा आहे, कंपनीनं किती रक्कम जमा केलीय आणि केव्हा केवा पैसे जमा झाले याची माहिती फोन आणि लॅपटॉवरुन घेऊ शकता.

मिस्ड कॉलद्वारे शिल्लक रक्कम तपासा

तुम्ही जर तुमच्या ईपीएफओच्या वेबसाईटवर लॉगीन करुन शिल्लक रक्कम तपासू शकला नाही तर तर अजून काही पर्याय आहेत. मिस्ड कॉल करुन तुम्ही शिल्लक रक्कम तपासू शकता, ईपीएफओकडे खातेदाराचा मोबाईल नंबर नोंदवलेला असणं आवश्यक आहे. खातेधारक  त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन टोल-फ्री नंबर 9966044425 वर फोन करावा लागेल. फोन लागल्यानंतर तो फोन लगेच कट होतो. त्यानंतर काही सेकंदात तुमच्या मोबाईलवर ईपीएफओकडून शिल्लक रकमेसंदर्भात मेसेज येईल, यासाठी कोणतही शुल्क द्यावं लागत नाही.

मेसेजद्वारे तपासणीचा पर्याय

पीएफ शिल्लक रक्कम तपासणीचा आणखी एक पर्याय म्हणजे एसएमएस सेवा होय. यासाठी अधिकृत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन EPFO च्या 7738299899  या क्रमांकावर EPFOHO UAN हा मेसेज लिहून पाठवावा लागेल. यानंतर पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम समजेल. याशिवाय उमंग एपवरुन देखील पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे देखील समजेल.

पीएफ खात्यात शिल्लक रक्कम तपासल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याला पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर त्यासंदर्भातील नियम आणि कारणं यासंदर्भातील इतर माहिती देखील असणं आवश्यक आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.