PF खातेदारांसाठी गुड न्यूज, पीएफचे पैसे एटीएममधून ‘या’ महिन्यापासून काढता येणार
नवी दिल्ली : पीएफ खातेधारकांना दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. प्रॉविडंट फंडमधील रक्कम काढण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सरकारनं नवी सुविधा आणणार आहे. पीएफ खात्यातील रक्कम एटीएम आणि यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा मार्च 2026 पासून सुरु होऊ शकते. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांच्या मते पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातून 75 टक्के रक्कम काढता येते. येत्या काळात पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया सोपी केली जाईल.
PF Withdrawal from ATM : पीएफ खात्यातील रक्कम एटीएममधून कधीपासून काढता येणार
केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी वनइंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की मार्च 2026 अगोदर श्रम मंत्रालय अशी सुविधा आणणार आहे. त्या सुविधेद्वारे पीएफ खातेदार एटीएममधून पीएफ खात्यातील रक्कम काढू शकतात, असं मनसुख मांडवीय म्हणाले. श्रम मंत्रालय ईपीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया यूपीआयसोबत जोडली जाईल, असं त्यांनी म्हटलं.नव्या सुविधांचा उद्देश खातेदारांना फंडाची रक्कम जितक्या सोप्या पद्धतीनं काढता येईल तितकी सोपी बनवणं हा आहे. सध्या सर्वसामान्य लोक दैनंदिन आयुष्यात पैशांच्या व्यवहारांसाठी एटीएम आणि यूपीआयचा वापर करतात. त्यामुळं ईपीएफला देखील त्याच प्रमाणं जोडण्याचं नियोजन आहे, असं मनसुख मांडवीय म्हणाले.
मनसुख मांडवीय म्हणाले, यामुळं खातेदारांना ऑनलाईन पोर्टल किंवा एम्प्लॉयरवर अवलंबून राहावं लागणार नाही. क्लेम सेटल होण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी होईल.
पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात. काही सदस्यांसाठी ही प्रक्रिया किचकट वाटते, क्लेम मंजूर होऊन पैसे काढण्यास उशीर होतो. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले ईपीएफ खात्यातील रक्कम खातेदाराची असते. मात्र, वेगवेगळे फॉर्म भरावे लागत असल्यानं अनेकांची अडचण होते. ही अडचण सोडवण्यासाठी पीएफची रक्कम एटीएम आणि यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा सरकार आणत आहे. पीएफ खात्यातील रक्कम नोंदणीकृत खात्यात जमा होईल.
पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठीच्या नियमात यापूर्वीचं अनेक बदल करण्यात आले आहेत. ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार पीएफ खात्यातून रक्कम काढायची असल्यास जो क्लेम फॉर्म भरायचा असतो त्यासोबत चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो अपलोड करणं आवश्यक नाही. आता आधार ओटीपीच्या आधारे पडताळणी पूर्ण करुन पीएफ खात्यात रक्कम जमा केली जाते. पीएफ क्लेम मंजूर करण्यासाठीचा कालावधी देखील कमी करण्यात आला आहे. पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी क्लेम फॉर्म भरल्यास आता तीन दिवसांमध्ये क्लेम मंजूर होऊन ती रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा केली जाते.
आणखी वाचा
Comments are closed.