EPFO मधून पैसे काढण्याची चूक पडू शकते महागात! हे आहेत ते 5 मोठे नुकसान


PF हा नोकरदार वर्गासाठी त्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी सर्वात विश्वासार्ह गुंतवणुकीपैकी एक आहे. पण अनेकदा लोक गरजेच्या वेळी त्यातून पैसे काढतात. हा निर्णय तात्काळ दिलासा देत असला तरी, पण यामुळे तुमचे Retirement Planning, Tax Benefits यावर मोठा परिणाम होतो.  PF खात्यातून पैसे काढल्यास होणारे 5 मोठे तोटे कोणते आपण जाऊन घेऊयात..

1. चक्रवाढ व्याज

EPFO ची खरी ताकद असते ती ‘व्याजावर व्याज’ म्हणजेच (चक्रवाढ व्याज) मिळण्यात. दरवर्षी तुमची जमा रक्कम वाढत जाते आणि पुढच्या वर्षी त्या वाढलेल्या रकमेवर पुन्हा व्याज मिळते. पण, तुम्ही मध्येच पैसे काढले की, ही व्याजाची चेन तुटते. यामुळे, निवृत्तीच्या वेळी जी मोठी रक्कम मिळायला हवी, ती खूप कमी होते.

02. निवृत्ती निधी (Retirement Fund)

EPFO चा मुख्य उद्देश निवृत्तीनंतर आधार देणे हा आहे. जेव्हा तुम्ही त्यातून पैसे काढता, तेव्हा तुमची अंतिम बचत कमी होते. जर एखादी व्यक्ती दर महिन्याला 5000 जमा करत असेल आणि 25 वर्षांपर्यंत EPFO ला हात लावत नसेल, तर त्याला अंदाजे 50-55 लाख मिळू शकतात. पण जर त्याने मध्येच तीन-चार वेळा पैसे काढले, तर ही रक्कम फक्त 30-35 लाखांपर्यंत खाली येऊ शकते. म्हणजेच निवृत्तीच्या वेळी मिळणारी आर्थिक सुरक्षा कमकुवत होते.

3. कर लाभ परिणाम

EPF मध्ये केलेली गुंतवणूक कमीतकमी 5 वर्षांसाठी ठेवा, म्हणजे तुम्हाला गुंतवणूक, व्याज आणि काढलेले पैसे या तिन्हीवरही ‘कर’ भरावा लागणार नाही.  जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी EPF मधून पैसे काढले, तर त्यावर तुम्हाला कर भरावा लागतो. काढलेले व्याज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये जोडले जाते आणि  TDS देखील कापला जाऊ शकतो.

04. आपत्कालीन निधी (Emergency Fund)

अनेक लोक EPFO चा वापर आपत्कालीन निधी म्हणून करतात, पण त्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. EPFO हे तुमच्या दीर्घकालीन (Long-term) सुरक्षेसाठी आहे, छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही. PF चा
वापर  फक्त शेवटचा पर्याय म्हणून करा, तोही तेव्हाच जेव्हा इतर कोणताही मार्ग नसेल.

5. भविष्यातील नोकरी आणि पेन्शन लाभांवर परिणाम

PF खात्यातून पैसे काढल्याने तुमच्या EPS Employee Pension Scheme बॅलन्सवरही परिणाम होतो.  जर तुम्ही वारंवार खाते बंद केले किंवा पैसे काढले, तर तुमची नोकरीची सेवा हिस्ट्री (Service History) रीसेट होऊ शकते. याचा अर्थ, निवृत्तीच्या वेळी मिळणारी पेन्शन किंवा ग्रॅच्युइटीची गणना कमी सेवा कालावधीवर होईल. पैसे काढल्यामुळे हा लाभ कमी होतो.

आणखी वाचा

Comments are closed.