एपस्टीन फाईल्समध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगलच्या संस्थापकांची छायाचित्रे; बिल गेट्स, सर्गेई ब्रिन यांच्यासह अनेक अब्जाधीशांचे महिलांसोबत फोटो

जगभराचे लक्ष लागलेल्या अमेरिकेतील एपस्टीन सेक्स स्पॅण्डलमध्ये सर्वात मोठा खुलासा होण्यापूर्वीच खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील डेमोव्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी गुरुवारी रात्री उशिरा 68 नवी छायाचित्रे जारी केली. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन, चित्रपट निर्माते वुडी एलन, फिलॉसॉस्फर नोम चॉम्स्की आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासारख्या दिग्गज आणि प्रभावशाली व्यक्तींची ही छायाचित्रे आहेत. त्यात हे सर्वजण काही महिलांसोबत दिसत असून यामुळे जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

एपस्टीनचा तपास पुन्हा सुरू झाल्यानंतर 95 हजार छायाचित्रे आणि इतर माहिती जप्त करण्यात आली होती. ती आता अमेरिकेचा न्याय विभाग जारी करणार आहे. त्यानंतर अमेरिकन सरकारला त्यासंदर्भात सविस्तर माहितीदेखील द्यावी लागणार आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांची यादीदेखील सरकारला द्यावी लागणार आहे.

ओळखपत्रेही समोर

एपस्टीनच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या काही अल्पवयीन मुली आणि महिलांची ओळखपत्रेही जारी झाली आहेत. त्यांची ओळख लपविली आहे. ओळखपत्रांवरून या महिला रशिया, इटली, मोरोक्को, दक्षिण आफ्रिका, चेक रिपब्लिक, युव्रेन, लिथुआनिया या देशांशी संबंधित असल्याचे समजते.

चॅट, रेट, फोटो

आज जारी केलेल्या 68 पह्टोंबरोबर धक्कादायक चॅटही समोर आले आहेत. एका स्क्रीनशॉटमध्ये टेक्स्ट मेसेज दिसतो. ‘मी आता मुली पाठवत आहे’ या मेसेजसोबत एका अल्पवयीन मुलीची माहितीही आहे. हा मेसेज कोणी आणि कोणाला पाठवला हे स्पष्ट झालेले नाही. यात एका रशियन मुलीची पिंमत एक हजार डॉलर असे मेसेजमध्ये लिहिलेले दिसते.3

डेमोव्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी छायाचित्रे चालू ठेवले केली. त्यात बिल गेट्स हे दोन महिलांसोबत दिसतात. महिलांचे चेहरे दाखविण्यात आलेले नाहीत. दुसऱया छायाचित्रात महिलेच्या शरीरावर पेनाने लिहिलेली काही वाक्ये दिसतात. बाजूला 'लोलिता' हे वादग्रस्त कादंबरी दिसते. हे पाहतो एकाच महिलेचे आहेत च्या वेगवेगळय़ा, हे स्पष्ट झालेले नाही. तसेच जगप्रसिद्ध व्यक्तींसोबत महिलांच्या छायाचित्रांचा कोणताही चुकीचा अर्थ किंवा माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी काही छायाचित्रे चालू ठेवले करण्यात आली होती. त्यात अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचीही काही महिलांसोबतची छायाचित्रे चालू ठेवले करण्यात आली होती.

Comments are closed.