थोडक्यात हुकला ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या हातून संधी निसटली!
रविवारी भारतीय संघाने न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 50 षटकात 9 विकेट्स गमावून 249 धावा केल्या. नंतर धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या पूर्ण संघाने 45.3 षटकात 205 धावा केल्या. भारतीय संघाच्या विजयात फिरकीपटूंनी खूप महत्त्वाचे योगदान दिले. वरून चक्रवर्तीने 5 विकेट्स घेतल्या. याशिवाय कुलदीप यादवने 2 फलंदाजांना बाद केले. तसेच अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने 1- 1 विकेट्स घेतल्या. या पद्धतीने भारतीय संघाच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या नऊ फलंदाजांना बाद केले. पण तुम्हाला माहिती आहे का भारतीय संघाची न्यूझीलंड विरुद्ध एक मोठा विक्रम करण्याची संधी हुकली.
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या फिरकीपटूंनी 37.3 षटकापर्यंत गोलंदाजी केली. पण तुम्हाला माहिती आहे का? वनडे इतिहासात कोणत्या संघाच्या फिरकीपटूने एका सामन्यात सर्वात जास्त षटके टाकली आहेत? या यादीमध्ये श्रीलंका संघ वरच्या स्थानी आहे वेस्ट इंडिजविरुद्ध 1996 मध्ये श्रीलंकाच्या फिरकीपटूंनी 44 षटकापर्यंत गोलंदाजी केली होती. या पद्धतीनेच जर न्यूझीलंड विरुद्ध भारतीय फिरकीपटूंनी दोन-तीन षटके अजून गोलंदाजी टाकली असती तर एक मोठा विक्रम भारताच्या नावावर झाला असता. टॉप 3 विक्रम श्रीलंकाच्या नावावर आहेत. न्यूझीलंड विरुद्ध 1998 मध्ये श्रीलंकाच्या फिरकीपटूंनी 44 षटक गोलंदाजी केली होती. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2004 मध्ये 44 षटके गोलंदाजी केली होती.
या यादीत श्रीलंका नंतर ओमान चा नंबर आहे. ओमानच्या फिरकीपटूंनी नेदरलँड विरुद्ध 37.3 षटके गोलंदाजी केली होती. तसेच भारतीय संघ दुबईमध्ये न्यूझीलंड विरुद्ध हा विक्रम करण्यापासून हुकला. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्युझीलँड विरुद्ध भारतीय फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल ने 10-10 षटके टाकली. कुलदीप यादवने 9.3 षटके गोलंदाजी केली याशिवाय रवींद्र जडेजाने षटकापर्यंत गोलंदाजी केली याप्रमाणे भारतीय टीमच्या फिरकीपटूंनी 37.3 षटकांपर्यंत गोलंदाजी केली.
हेही वाचा
पाकिस्तानची नाचक्की! सेमीफायनलपूर्वीच गद्दाफी स्टेडियमच्या छताला गळती, PCBची मोठी फजिती
मोठी बातमी: आयपीएल 2025 साठी अजिंक्य रहाणेची KKRच्या कर्णधारपदी निवड!
रोहित शर्मा कर्णधार म्हणून किती यशस्वी? जाणून घ्या संख्यांमधून
Comments are closed.