रेल्वे स्थानकांतील सरकते जिने ठरताहेत कुचकामी! आपत्कालीन बटणाचा निष्कारण वापर; ज्येष्ठ नागरिकांची होते गैरसोय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उपनगरी रेल्वेच्या स्थानकांतील प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने उभारण्यात आले. मात्र विविध कारणांमुळे हे सरकते जिने वेळोवेळी कुचकामी ठरत आहेत. प्रमुख स्थानकांत कमी संख्येत असलेल्या सरकत्या जिन्यांवर गर्दीचा ताण येत आहे. त्यात समाजपंटकांकडून निष्कारण सरकत्या जिन्याच्या आपत्कालीन बटणाचा वापर केला जात आहे. त्यामुळे जिने बंद राहण्याचे प्रमाण वाढले असून ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे.

प्रमुख स्थानकांवर गर्दीच्या तुलनेत हे जिने नसल्यामुळे ‘पीक अवर्स’ला सरकत्या जिन्यांवर ताण येत आहे. एकाच वेळी सर्वच प्रवासी सरकत्या जिन्यावर दाटीवाटीने उभे राहतात. काही स्थानकांत समाजपंटकांकडून निष्कारण सरकत्या जिन्यांच्या आपत्कालीन बटणाचा वापर केला जातो. त्यामुळे पुढील अर्धा ते एक तास जिना बंद राहतो. जिना पूर्ववत सुरू करण्यास कर्मचारी वेळेवर दाखल होत नाहीत, असे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ (पश्चिम रेल्वे) उपाध्यक्ष राजेश पंडय़ा यांनी सांगितले.

मनुष्यबळाची कमतरता

पश्चिम रेल्वेकडे सरकत्या जिन्यांवर देखरेख ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. उपनगरी रेल्वे स्थानकांतील सरकत्या जिन्यांचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी जेमतेम दहा ते बारा कर्मचारी आहेत. त्यातील काही कर्मचारी पंट्रोल कक्षात कार्यरत असतात. त्यामुळे जिने बंद असल्याच्या तक्रारींवर वेळीच कार्यवाही करणे अशक्य बनते, असे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Comments are closed.