इथिओपियन ज्वालामुखीचा भारतावरही परिणाम होतो

राखेचे ढग दिल्ली-मुंबईपर्यंत पोहोचले : विमान वाहतुकीवर परिणाम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इथिओपिया देशाच्या हेली गुब्बी प्रदेशात दोन दिवसांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. जवळजवळ 10,000 वर्षांत पहिल्यांदाच इथिओपियामध्ये अशी घटना घडली. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राख आणि सल्फर डायऑक्साइडचा मोठा लोट आकाशात पसरला आहे. हीच राख आता भारतातील दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचल्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांना एक कडक सूचना जारी करत ज्वालामुखीची राख असलेल्या क्षेत्रांवरून उ•ाणे टाळावीत, असे निर्देश दिले आहेत.

इथिओपियामधील ज्वालामुखीचा धूर सामान्य वाटू शकतो, परंतु प्रत्यक्षात तो ज्वालामुखीची राख आहे. या राखेमध्ये लहान काचेसारखे कण असतात. अशी राख जोरदार वाऱ्यांसह लांबपर्यंत जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवर परिणाम दिसून येत आहे. वाऱ्याने वाहून नेलेली ज्वालामुखीची राख आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. या क्षेत्रातून अनेक भारतीय विमाने दररोज उ•ाण करतात. यादरम्यान डीजीसीए आणि मुंबई-दिल्ली हवामान कार्यालयाने विमान कंपन्यांसाठी नियमावली जारी केली आहे.

इथिओपियातून राखेचे ढग उठून ते सुमारे 30,000-35,000 फूट उंचीवर पोहोचले आहेत. वाऱ्याची दिशा आखाती देशांकडे असल्यामुळे राखेचा मोठा भाग ओमान आणि अरबी समुद्राकडे वाहू लागला. सोमवारपासून ही राख भारताच्या अवकाशक्षेत्रात पोहोचल्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य भारतातील हवाई मार्गांना त्याचा फटका बसला आहे.

विमान कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्वे

विमानतळ पातळीवर अतिरिक्त सुरक्षा उपाय देखील लागू करण्यात आले आहेत. ज्या भागात राख विमानापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी धावपट्टी, टॅक्सीवे आणि हवाई क्षेत्राची विशेष तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास ऑपरेशन्स रद्द किंवा मर्यादित केले जाऊ शकतात. हवेतील राखेची हालचाल कधीही दिशा बदलू शकते. त्यामुळे विमान कंपन्यांना उपग्रह प्रतिमा, हवामान डेटा, नोटम, अस्थम आणि ज्वालामुखीय राख सल्लागारांचे 24/7 निरीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments are closed.