IND vs AUS: वनडेत पहिल्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल! हे दोन खेळाडू संघातून बाहेर
टीम इंडियाविरुद्ध (Team india vs Australia) पर्थ वनडे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेचा दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता एडिलेड ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. मिचेल मार्शच्या (Mitchell marsh) नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी टीमने जोरदार तयारी सुरू केली आहे.
एडिलेड वनडेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. ॲडम झम्पा आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्मामुळे पहिल्या वनडेमध्ये खेळू शकला नव्हता. आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमन याला संघातून रिलीज करण्यात आलं आहे. शेफिल्ड शिल्ड स्पर्धेमुळे अॅलेक्स कॅरी पहिल्या वनडेमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. आता तो संघात परत आला असून त्याला थेट प्लेइंग प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जोश इंग्लिस (Josh English) अजूनही दुखापतीतून सावरलेला नसल्यामुळे तो दुसऱ्या वनडेसाठी अनुपलब्ध आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याचा हिरो ठरलेला जोश फिलिप (Josh Philip) याला संघात कायम ठेवण्यात आलं आहे. इंग्लिसचा तिसऱ्या वनडेत पुनरागमन होण्याचा अंदाज आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज बेन ड्वार्शुईस देखील दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही.
दुसऱ्या वनडेसाठी ऑस्ट्रेलियाची संभाव्य टीम:
ट्रेविस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कोनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, जोश हेजलवुड, मार्नस लाबुशेन, जेव्हिअर बार्टलेट, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर).
Comments are closed.