IND vs SA: गुवाहाटीतील पराभवाआधीच जडेजाने टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीबाबत मौन सोडलं, जाणून घ्या काय म्हणाला?

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील गुवाहाटी कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाला विजयासाठी 549 धावांचे लक्ष्य मिळाले असून संघ अडचणीत आहे. भारताने 27 धावांवर 2 विकेट गमावल्या आहेत. शेवटच्या दिवशी टीम इंडियाचं मुख्य उद्दिष्ट सामना ड्रॉ करणे असणार आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज ज्या पद्धतीने खेळत आहेत, त्यांना उरलेल्या 8 विकेट घेऊन भारताला मोठ्या फरकाने हरवणे सोपे वाटत आहे. आणि सामना संपण्यापूर्वीच टीम इंडियाकडून बहाणेबाजी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

चौथ्या दिवसाच्या खेळानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) प्रेस कॉन्फरन्समध्ये आला. इथे त्याने पराभवाचा ठपका टॉसवर ठेवला. जडेजाच्या मते, भारताने टॉस जिंकला असता तर चित्र वेगळं असतं.

2019 ला आम्ही त्याच्याविरुद्ध खेळलो तेव्हा आणि आता फारसा फरक नाही. त्यांचा स्क्वाडही जवळपास तसाच आहे. क्रिकेटमध्ये टायमिंग खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही टॉस जिंकला नाही, तर समस्या तिथूनच सुरू होतात. आम्ही टॉस जिंकला असता, तर कदाचित आमची स्थिती चांगली असती. पण हा खेळाचा एक भाग आहे.

जडेजाने पाचव्या दिवसाचा प्लानही सांगितला. त्याच्या म्हणण्यानुसार, सामना ड्रॉ करणे हेच त्याच्यासाठी विजयासारखं आहे.

आता सगळ्यांचं लक्ष पाचव्या दिवसावर आहे. आम्हाला चांगलं क्रिकेट खेळण्याची आणि आपल्या डिफेन्सवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. जर आम्ही पाचवा दिवस खेळू शकलो, तर आमच्यासाठी तोच विजय असेल.

549 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताच्या फलंदाजांनी सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) आणि केएल राहुलने (KL Rahul) सावधगिरीने खेळण्याची गरज होती. पण दोघेही लवकर बाद झाले.

तर केएल राहुलला सायमन हार्मर यांनी पवेलियनमध्ये पाठवलं. साई सुदर्शन (Sai surdarshan) आणि नाईटवॉचमन कुलदीप यादव क्रीजवर आहेत. आता पाचव्या दिवशी भारताचा खेळ कसा असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments are closed.