“आमची मदत धोनीही करू शकत नाही!” – पाक महिला संघाच्या माजी कर्णधाराचा संताप

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सहा दिवसानंतर यजमान संघ पाकिस्तान संघाचा स्पर्धेमधील प्रवास संपला. मोहम्मद रिजवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला न्यूझीलंड आणि भारत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. चॅम्पियन्स ट्रॉफी  स्पर्धेच्या बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघाला टीकांचा सामना करावा लागत आहे. तत्पूर्वी आता पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीर हिने पाकिस्तान मेन्स क्रिकेट संघाच्या अपयशी खेळीनंतर मोठ वक्तव्य केल आहे. तसेच तिने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख केला आहे.

सना मीरचं म्हणणं आहे की, पाकिस्तानी मेन्स संघाची अवस्था एवढी वाईट झाली आहे की महेंद्रसिंग धोनी सुद्धा त्यांची मदत करू शकत नाही. ती म्हणाली पाकिस्तान क्रिकेट संघ निवडताना चूक झाली आहे. पाकिस्तानी संघाच्या संघ निवडीनंतरच आम्ही गडबडलो होतो. पाकिस्तान संघाची निवड परिस्थितीनुसार करण्यात आली नाही. तसेच ती म्हणाली एवढ्या वाईट अवस्थेला महेंद्रसिंग धोनी किंवा युनिस खान सारखे व्यक्ती सुद्धा सुरळीत करू शकत नाहीत.

महिला संघाची माजी कर्णधार सना मीर म्हणाली की, आम्ही पाकिस्तान विरुद्ध भारत सामना बघत होतो, त्यावेळी मला माझ्या मित्राचा संदेश आला. जेव्हा पाकिस्तान संघाचा दुसरा फलंदाज 100 धावांवर बाद झाला होता. माझा मित्र म्हणाला की आता सामना संपला. तेव्हा मी म्हणाले, की आत्ता नाही जेव्हा संघ निवडला तेव्हाच सामना संपला.

सना मीर पुढे म्हणाली, की तुम्ही महेंद्रसिंग धोनी किंवा युनिस खानला कर्णधार बनवा परंतु या संघाची अवस्था कोणी बदलू शकणार नाही. आमच्या संघाला भारतीय संघाविरुद्ध दुबई मध्ये खेळायचे होते, तर तुम्ही दोन पार्ट टाईम फिरकीपटूं सोबत कसे जाऊ शकता ? आत्ता वनडे फॉरमॅटमध्ये अबरार अहमद नवीन आहे, त्याने मागच्या महिन्यात फक्त 2 विकेट्स घेतल्या. सना मीरचं म्हणणं आहे की,‌पाकिस्तान संघ निवडल्यानंतरच तो स्पर्धेच्या 50 प्रतिशत बाहेर गेला होता.

हेही वाचा

IND vs NZ: ‘मोहम्मद शमीला विश्रांती द्या आणि… ‘, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटूचा सल्ला

या हंगामात माहीचा मास्टरस्ट्रोक, नवी बॅट करणार कमाल!

‘भारताला प्रवासाचा थकवा नाही, त्यामुळे त्यांना स्पर्धेत मोठा फायदा’- पॅट कमिन्स

Comments are closed.