युद्ध थांबलं तरीही पाकिस्तानला दिलासा नाहीच, ‘या’ गोष्टींवर बंदी कायम राहणार?
भारत पाकिस्तान युद्धबंदी: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या युद्धजन्य (India Pakistan war) परिस्थितीला विराम मिळाला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू झाली आहे. युद्धबंदी जरी झाली असली तरीह अद्याप पाकिस्तानला दिलासा मिळाला नाही. कारण भारताने अनेक गोष्टींवरील बंदी कायम ठेवली आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
पाकिस्तानविरोधात घेतलेले निर्णय कायम राहणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानवर लादलेल्या पाणी, व्यापार, राजनैतिक आणि आर्थिक निर्बंधांवर कोणतीही चर्चा झाली नाही. तो अजूनही त्याच पद्धतीने काम करत राहील. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने कारवाई केली आणि सिंधू पाणी करार, पाकिस्तानी व्हिसा, व्यापार, राजनैतिक आणि आर्थिक निर्बंध लादले होते.
ही बंदी पाकिस्तानवर कायम राहणार?
1. सिंधू पाणी कराराला स्थगिती कायम राहणार
2. कोणतेही व्यापारी संबंध पुनर्संचयित केले जाणार नाहीत.
3. राजनैतिक पातळीवरही ‘जैसे थे’ स्थिती राहील. पाकिस्तानला परत पाठवण्यात आलेल्या दूतावासातील राजदूतांना परत बोलावले जाणार नाही.
4. पाकिस्तानवर लादलेले आर्थिक निर्बंधही सुरूच राहतील. कोणतेही मालवाहू जहाज इत्यादी भारतीय बंदरांवर येऊ शकणार नाहीत.
पाकिस्तानने केली युद्धबंदीची विनंती
पाकिस्तानी हवाई तळांवर भारतीय सैन्य दलाने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती केली होती. भारताने देखील युद्धबंदीवर सहमती (भारत पाकिस्तान युद्धबंदी) दर्शविली आहे. पाकिस्तानी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) भारतीय समकक्षांना केलेल्या फोन कॉलमध्ये, पाकिस्तानने स्पष्टपणे सांगितले की ते यापुढे कोणतेही हल्ले करणार नाहीत आणि औपचारिकपणे युद्धबंदीची विनंती केली. अमेरिकेने पाकिस्तानवर थेट दबाव आणून तणाव कमी करण्यात भूमिका बजावली. अमेरिकेने तात्काळ युद्धबंदीच्या बदल्यात 1 अब्ज डॉलर्सचे आयएमएफ कर्ज थांबवण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणला.
सिंधू पाणी करारावरील स्थगिती कायम
भारत पाकिस्तानसोबत कोणतीही जलविज्ञानविषयक माहिती शेअर करणार नाही आणि उत्तरेकडील तीन नद्यांवर जल पायाभूत सुविधा प्रकल्प पुढे नेईल. याव्यतिरिक्त, अमेरिकेने भारताच्या सुधारित युद्ध सिद्धांताला औपचारिकपणे स्वीकारले आहे. ज्या अंतर्गत भविष्यातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला युद्धाची कृती मानली जाईल.
https://www.youtube.com/watch?v=Si1q0g7x5bm
महत्वाच्या बातम्या:
Sofiya Qureshi : सोफिया कुरेशींनी ठणकावून सांगितलं, भारताकडून एकाही मशिदीवर हल्ला नाही,पाकच्या फेक न्यूजचा पुन्हा बुरखा फाडला
अधिक पाहा..
Comments are closed.