'लहान मुलांनाही माहिती…' माजी भारतीय खेळाडूची पाकिस्तानवर टिका
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज आशिया कप 2025 मध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू निखिल चोप्राने पाकिस्तानी संघाची जोरदार खिल्ली उडवली आहे. पाकिस्तानकडे सध्या एकही मोठा तारा नाही. बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनाही टी20 संघातून बाहेर करण्यात आले आहे. ते नवीन चेहऱ्यांसह उतरले आहेत आणि यावरूनच निखिलने पाकिस्तान संघाची बेइज्जत केली.
निखिल चोप्राने एका मुलाखतीत पाकिस्तान संघाबद्दल बोलताना सांगितले की, त्यांच्या संघाकडे एकही मोठा खेळाडू नाही आणि मुलांनाही त्यांच्या खेळाडूंची नावे माहिती नाहीत. त्यांनी म्हटले की, 90 च्या दशकातील ताऱ्यांची नावे आजही सगळ्यांना आठवतात. त्यांनी पुढे सांगितले, “जर तुम्ही त्यांच्या (पाकिस्तान) संघाकडे पाहिलात आणि रस्त्यावर कुठल्याही मुलाला त्यांचे टॉप 3-4 खेळाडूंची नावे विचारली, किंवा मग एखादा क्रिकेटचा मोठा चाहता जो टी20 फॉरमॅट फॉलो करतो, त्यालाही नावे माहिती नसतील. पण जर तुम्ही त्यांना पाकिस्तानच्या 90 च्या दशकातील खेळाडूंची नावे विचारली, तर त्यांना नक्की आठवतील.”
निखिल चोप्राने भारतीय संघाच्या स्टार पॉवरचा उल्लेख करत सांगितले की, 15 सदस्यीय स्क्वाडमध्ये स्थान न मिळालेला यशस्वी जयसवालसुद्धा चाहत्यांना चांगलाच परिचित आहे. त्यांनी म्हटले, “फरक इतकाच आहे की जर तुम्ही भारताचा प्लेइंग 11 किंवा 15 सदस्यीय स्क्वाड पाहिलात, तर त्यात मॅच विनर्स, अनुभवी खेळाडू आणि वर्ल्ड क्लास खेळाडू आहेत. यशस्वी जायसवालसारखा खेळाडू, ज्याला स्क्वाडमध्ये स्थान मिळालेले नाही, त्यालाही लोक ओळखतात. त्यामुळे तुम्ही सहज समजू शकता की अजित आगरकर आणि टीम मॅनेजमेंटसमोर किती मोठे डोकेदुखीचे आव्हान आहे.”
Comments are closed.