T20 WC 2026 – जो जिंकतो तोच जगज्जेता ठरतो

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टी-20 वर्ल्ड कपच्या हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन्ही उपांत्य लढतीत जो जिंकला तोच जगज्जेता ठरला आहे. त्यामुळे आजही वानखेडेवर जो बाजी मारेल तोच जगज्जेता होण्याची शक्यता अधिक असेल.

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीत पहिली झुंज 2022 च्या वर्ल्ड कपमध्ये ऍडलेड येथे रंगली होती. या सामन्यात इंग्लंडने हिंदुस्थानच्या धुव्वा उडवताना हिंदुस्थानचे 168 धावांचे आव्हान 16 षटकांत बिनबादच गाठले. त्यानंतर अंतिम फेरीतही इंग्लंडच विजेता ठरला. 2024 मध्ये निकाल याच्या उलटा लागला. हिंदुस्थानच्या 172 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 103 धावांतच आटोपला आणि हिंदुस्थानने जगज्जेतेपद जिंकण्याचा करिश्मा केला. याचाच अर्थ दोघांत जो जिंकतो तोच जगज्जेता होतो. उद्याही असाच निकाल लागला तर या योगायोगाची हॅटट्रिक साजरी केली जाईल.

Comments are closed.