सर्व देवाच्या हातात आहे! धर्मेंद्र रुग्णालयातून परतल्यानंतर हेमामालिनी यांची पहिली प्रतिक्रीया

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून ११ दिवसांनंतर (बुधवारी 12 नोव्हेंबर) सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या परतीच्या बातमीने अनेकांना आनंद झाला. परंतु धर्मेंद्र अजूनही पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी आणि डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स शेअर केले. त्यांचे डॉक्टर प्रीतित समदानी यांनी सांगितले की, ८९ वर्षीय धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि आता ते घरीच उपचार आणि बरे होत राहतील. हेमा मालिनी यांनी या कठीण काळात त्यांच्या भावना शेअर केल्या. त्यांनी ‘ही-मॅन’ बद्दलच्या आरोग्य अपडेट शेअर केल्या. त्यासोबतच्या हेमामालिनी यांनी सध्या त्यांच्या मुलांची रात्रीची झोप उडाली आहे असेही म्हटले आहे.

धर्मेंद्र रुग्णालयात असताना संपूर्ण देओल कुटुंब एकजुटीने राहिले. सनी आणि बॉबीपासून ते ईशा आणि हेमा मालिनीपर्यंत सर्वजण रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. आता, ११ दिवसांनंतर, धरम पाजी घरी आहेत. त्यांच्या आगमनापासून नातेवाईक आणि चित्रपटसृष्टीतील सदस्य त्यांना भेटायला येत आहेत. हेमा मालिनी यांनी आता धर्मेंद्रबद्दल भावनिक विधान केले आहे.

हेमा मालिनी यांनी सुभाष के. झा यांच्यासोबत या कठीण काळाबद्दलच्या भावना शेअर केल्या. हेमा म्हणाली, “माझ्यासाठी हा काळ सोपा नव्हता. धरमजींची तब्येत आमच्यासाठी खूप चिंतेचा विषय आहे. त्यांच्या मुलांना रात्रीची झोप येत नाहीये. अशा कठीण काळात मी कमकुवत राहू शकत नाही, कारण माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत… पण हो, ते घरी परतले आहेत याचा मला आनंद आहे. ते रुग्णालयातून बाहेर पडल्याचा आम्हाला दिलासा आहे. यावेळी, ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याभोवती असले पाहिजे. बाकीचे देवाच्या हातात आहे… कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.”

Comments are closed.