त्याला सरळ तुरुंगात टाका…; चहलच्या व्हायरल व्हिडीओनंतर क्रिकेटविश्वात खळबळ, क्रिकेटपटूचा संता

युझवेंद्र चहलवर एल शिवरामकृष्णन : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात वादांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता नव्या वादाच्या केंद्रस्थानी युझवेंद्र चहल आला आहे. पंजाब किंग्सचा हा स्टार लेगस्पिनर फ्लाइटमध्ये ई-सिगारेट वापरताना दिसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

हा व्हिडीओ पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला होता. त्यानंतर चाहत्यांपासून माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनीच यावर तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, आयपीएल 2026 दरम्यान वेप वापरताना पकडला गेलेला चहल हा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये वेप वापरताना दिसला होता. त्या प्रकरणात त्याच्यावर 25 टक्के मॅच फीचा दंड आणि एक डिमेरिट पॉइंटची कारवाई करण्यात आली होती.

मात्र, माजी भारतीय फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी या शिक्षेला अत्यंत सौम्य म्हटलं आहे. त्यांनी थेट चहलला तुरुंगात पाठवण्याची मागणी करत नवीनच वादाला तोंड फोडलं. शिवरामकृष्णन यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं, “भारतात वेपिंगवर बंदी आहे. मग अशा प्रकरणात संबंधित व्यक्ती तुरुंगात असायला हवी. कायदे बनवून त्यांची अंमलबजावणीच झाली नाही तर त्याचा उपयोग काय? फक्त 25 टक्के मॅच फीचा दंड ही खूपच किरकोळ शिक्षा आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीने असं केलं असतं तर त्याच्यावर काय कारवाई झाली असती?”

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळचे सचिव देवजित सैकिया यांनीही याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी जारी केलेल्या अ‍ॅडव्हायजरीमध्ये स्पष्टपणे नमूद केलं की, ड्रेसिंग रूम, डगआउट, टीम हॉटेल आणि प्रॅक्टिस सुविधा यांसारख्या सर्व आयपीएल परिसरात वेप, ई-सिगारेट आणि इतर प्रतिबंधित पदार्थांचा वापर पूर्णपणे बंदीस्त आहे.

त्यांनी पुढे इशारा देत म्हटलं की, “भारतात लागू असलेल्या कायद्यांनुसार वेप आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी आहे. त्यामुळे अशा प्रकारचं कृत्य करणारी व्यक्ती केवळ बीसीसीआय आणि आयपीएलच्या नियमांचंच उल्लंघन करत नाही, तर ती कायदेशीर गुन्हाही ठरू शकते.”

हे ही वाचा –

IPL 2026 Points Table : गुजरातचा IPL मधील गेमचेंजर विजय! RCB-CSKला भरली धडकी, राजस्थानला प्लेऑफच्या दारातून बाहेर फेकलं, 5 पॉइंटमध्ये समजून घ्या गेम

आणखी वाचा

Comments are closed.