6 6 6 6… षटकारांचा पाऊस पाडत ‘या’ खेळाडूने रचला इतिहास! वैभव सूर्यवंशीच्या आधीच तोडला गेलचा रेकॉर्ड, केकेआरशी कनेक्शन

गुजरातच्या आर्या देसाईने टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. याबरोबरच त्याने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज क्रिस गेलचा मोठा विक्रम मागे टाकला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनद्वारे (जीसीए) खेळवण्यात आलेल्या सुरत क्रिकेट टी२० लीगमध्ये त्याने ८१ चेंडूत नाबाद १९३ धावांची विक्रमी खेळी केली आहे. टी२० क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम गेलच्या नावावर होता. त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना २०१३च्या हंगामात ६६ चेंडूत १३ चौकार आणि १७ षटकारांसह नाबाद १७५ धावा केल्या होत्या. तो विक्रम मोडणे अशक्य असे वाटत असताना भारताच्या आर्याने मात्र ते शक्य करून दाखवले आहे.
आर्या गुजरातचे दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये प्रतिनिधित्व करतो. आता त्याने टी२० मध्ये जबरदस्त फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने आपल्या या स्फोटक खेळीत २१ चौकार आणि १४ षटकार मारले आहेत. त्याच्या या उत्तम खेळीचे कौतुक जीसीएचे सचिव अनिल पटेल यांनी केले आहे.
आर्या या टी२० लीगमध्ये लुथरा पेगाससकडून खेळताना कैलाश स्पोर्ट्सविरुद्ध ही खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे लुथराने कैलाश संघाला विजयासाठी २६८ धावसंख्येचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना कैलाश संघ २० षटकात ९ विकेट्स गमावत १७४ धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे ९३ धावांनी लुथराने हा सामना जिंकला.
आर्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग राहिला आहे. त्याला २०२३ च्या हंगामात २० लाख रुपयांमध्ये रिप्लेसमेंट म्हणून घेतले होते. तेव्हा त्याचे आयपीएल पदार्पण झाले नाही आणि त्यानंतर केकेआरने त्याला मुक्त केले.
Comments are closed.