प्रयागराजमधील संगमच्या खाली प्राचीन नदीचे अस्तित्व
सरस्वती’ नदी असण्याची शक्यता : 4-5 किलोमीटर रुंद पात्र
वृत्तसंस्था/ प्रयागराज
प्रयागराजच्या संगमाला शतकांपासून गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या एकत्र येण्याच्या स्थळाच्या रुपात पूजले जात राहिले आहे. आता वैज्ञानिकांनी या विश्वासाला मजबूत करणारा मोठा पुरावा दिला आहे. हैदराबादच्या सीएसआयआर-नॅशनल जियोफिजिकल रिसर्च इन्स्टीट्यूटच्या (एनजीआरआय) वैज्ञानिकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गंगा आणि यमुनादमयान जमिनीच्या आत एक विशाल प्राचीन नदी (पेलियो रिव्हर) वाहत होती असा शोध लावला आहे. हा शोध संगमाच्या पौराणिक कहाणीला शास्त्राrय आधार देत आहे.
एनजीआरआयच्या वैज्ञानिकांनी एअरबोर्न जियोफिजिकल तंत्रज्ञान (हेलिकॉप्टरमधून सर्वेक्षण) आणि कन्फर्मेटरी ड्रिलिंगचा वापर केला. डॉ. सुभाष चंद्रा यांच्या टीमने गंगा-यमुना संगम क्षेत्रात 10-15 मीटर खाली एका मोठ्या नदीच्या काठाचा शोध लावला आहे. हा शोध पूर्णपणे पुष्टीप्राप्त आहे, आम्ही ड्रिलिंग करून प्रत्यक्ष पुरावे मिळविले आहेत असे सुभाष चंद्रा यांनी सांगितले आहे.
प्राचीन नदीचे स्वरुप
ही प्राचीन नदी जमिनीखाली दाबली गेलेली आहे, म्हणजेच पेलियो चॅनेल 4-5 किलोमीटर रुंद असून ते गंगा आणि यमुनेइतके मोठे आहे. याची खोली आणि आधार स्तर दोन्ही नद्यांसमान आहे, जो ही वेगळी नदी होती आणि गंगा किंवा यमुनेचा जुना मार्ग नव्हता हे सिद्ध करते. नदीत वळणदार पॅटर्नही दिसून आले, ते ही नदी गंगा-यमुनासोबत वाहत होती हे दर्शवितात. प्रारंभी 45 किलोमीटर लांबीचा शोध लागला, नंतर नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाच्या सहकायांने याला कानपूरपर्यंत वाढवत 200 किलोमीटर करण्यात आले. ही नदी त्याहून पुढे पश्चिम्sढकडे हिमालयाच्या दिशेने फैलावलेली असू शकते अशी शक्यता वैज्ञानिकांना वाटत आहे.
वैज्ञानिकांनी संगमापासून जवळपास 25 किलोमीटर आधीपर्यंत या नदीला स्पष्टपणे ओळखले आहे. प्रयागराज शहरातील दाट लोकसंख्या, विजेच्या तारा आणि इमारतींमुळे सर्वेक्षण करणे अवघड होते. शहरावरही सर्वेक्षण होऊ शकले नाही. परंतु नदी संगमानजीक पोहोचत नसल्याचे आम्ही मानत नाही. काळासोबत नद्या मार्ग बदलत असतात. नदीत आंशिक स्वरुपात पाणी आहे. ही नदी दाबले गेलेल्या परस्परांमध्ये जोडलेल्या एक्वीफर सिस्टीमचा हिस्सा आहे, जी गंगा आणि यमुनेशी जोडलेली आहे, यामुळे क्षेत्रात भूजल स्तर वाढविण्यास मदत होऊ शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
भूजल संकटावर मात करता येणार
गंगेच्या मैदानात भूजल स्तर वेगाने खालावत आहे, या प्राचीन नदी चॅनेलला रिचार्ज करून पावसाचे पाणी आणि पृष्ठभागीय पाण्याला भूमिगत केले जाऊ शकते असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. यामुळे उन्हाळ्यात नद्यांमध्ये पाणी वाढणार आणि भूजलाची गुणवत्ताही सुधारणार आहे. हा शोध जलव्यवस्थापन, औद्योगिक प्रदूषण नियंत्रण आणि भूजल सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
वर्णनाशी मिळताजुळता आकार
या जमिनीखाली दाबले गेलेल्या नदीचे लोकेशन आणि आकार पौराणिक सरस्वती नदीच्या वर्णनाशी मिळताजुळता आहे. हा शोध महत्त्वपूर्ण आहे, कारण ही नदी गंगा आणि यमुनेइतकी मोठी असून संगमानजीक स्थित आहे. यापूर्वीही पॅलियो चॅनेल मिळाले आहेत, परंतु इतका मोठा, निरंतर आणि संगमानजीक पहिल्यांदाच मिळाला आहे.
Comments are closed.