काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले मोहम्मद मुकीम यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशा काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले वरिष्ठ नेते मोहम्मद मुकीम यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मुकीम यांनी राज्याच्या युवांना एकजूट होणे आणि ओडिशाच्या लोकांना नवा राजकीय पर्याय देण्याचे आवाहन केले आहे. मुकीम यांना याकरता त्यांची कन्या आणि काँग्रेस आमदार सोफिया फिरदौस यांची साथ मिळाली आहे. माझ्या पित्याचा हा नवा पुढाकार यशस्वी होईल असा मला विश्वास आहे. मी माझ्या पित्याला लोकांसाठी काम करताना पाहिले असल्याचे उद्गार सोफिया यांनी काढले आहेत.
नवा पक्ष सध्याच्या पक्षांपेक्षा वेगळा असेल आणि त्यांच्या प्रभुत्वाला आव्हान देणारा असेल. युवा शक्तीच राज्याच्या राजकारणात बदल घडवून आणू शकते असा दावा मुकीम यांनी केला आहे. मुकीम यांनी डिसेंबर महिन्यात सोनिया गांधी यांना पत्र लिहून ओडिशा काँग्रेस अध्यक्ष भक्तचरण दास आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मुकीम यांच्या या कृत्याला पक्षाने शिस्तभंग मानत त्यांची हकालपट्टी केली होती.
Comments are closed.