सीएसएमटी स्थानकातील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला मुदतवाढ, लांब पल्ल्याच्या गाड्या शॉर्टटर्मिनेट करणार
पुनर्विकास कामाच्या अनुषंगाने मध्य रेल्वेवरील सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकच्या कालावधीला 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या शॉर्ट टर्मिनेटलाही मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत लांब पल्ल्याच्या गाड्या दादर आणि ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्र. 16 आणि 17 वर सध्या पायाभूत आराखडा आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. यामुळे हावडा – सीएसएमटी एक्सप्रेस, अमरावती – सीएसएमटी एक्सप्रेस आणि मडगाव – एसएमटी तेजस एक्सप्रेस या गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील. तसेच मंगळुरू – सीएसएमटी एक्सप्रेस ठाणे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
Comments are closed.