म्हाडा दुकानांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 149 दुकानांच्या ई-लिलावासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी व अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे या प्रक्रियेसाठी आता 16 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
Comments are closed.