वहिनीसोबतच्या प्रेमासाठी सख्ख्या भावाला संपवलं, बॉडी पोत्यात घातली, दगड बांधून तलावात फेकलं, पण
जालना: जालन्यात एका धक्कादायक घटनेत अनैतिक संबंधात (Extra Marital Affair) अडथळा ठरलेल्या पतीची पत्नी आणि त्याच्याच सख्ख्या भावाने मिळून कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे हत्या (Extra Marital Affair)केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. ज्ञानेश्वर राम तायडे (वय २८) आणि मनिषा परमेश्वर तायडे (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी मिळून परमेश्वर तायडे (वय ३०) याची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सोमठाणा तलावामध्ये फेकून दिला. सोमठाणा येथील मनिषा तायडे हिचे आणि सख्ख्या दीराचे ज्ञानेश्वर तायडे यासोबत अनैतिक प्रेमसंबंध (Extra Marital Affair)होते. या संबंधांमध्ये मनिषाचा पती परमेश्वर राम तायडे हा अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून परमेश्वरला कायमचे संपवण्याचा कट रचला.(Extra Marital Affair)
१५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर आणि मनिषाने परमेश्वरच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर, त्यांनी परमेश्वरचा मृतदेह एका गोणीत भरला आणि त्याला दगड बांधून सोमठाणा तलावात फेकून दिला, जेणेकरून मृतदेह पाण्यावरती तरंगणार नाही. परमेश्वर घरी आला नसल्याचं गावभर पसरलं, आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली. या दोघांमधील अनैतिक संबंधांची कुणकुण गावकऱ्यांना आधीपासून होती, त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती बदनापूर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने तपास सुरू केला.
बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्या माहितीनुसार, परमेश्वर तायडे गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता झाला होता. त्याची पत्नी मनीषा हिनेच त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती आणि काही दिवस पतीला शोधण्याचा ती दिखावा करत होती. मात्र बुधवारी सोमठाणा परिसरातील तलावात संशयास्पद अवस्थेत परमेश्वरचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
चौकशीत त्याच्या कुटुंबीयांचे जबाब परस्परविरोधी निघाल्याने पोलिसांचा संशय वाढला. पुढील तपासात उघड झाले की मनीषा आणि ज्ञानेश्वर यांच्यात अनैतिक संबंध होते. परमेश्वर या संबंधांना विरोध करीत असल्याने दोघांनी त्याला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरच्या रात्री ज्ञानेश्वरने परमेश्वरवर दगडाने आणि कुऱ्हाडीने हल्ला केला, तर मनीषाने त्याच्या गळ्यात कापड आवळून त्याचा जीव घेतला. त्यानंतर दोघांनीही मृतदेह गोणीत गुंडाळून, त्याला दगड बांधून जवळच्या तलावात फेकून दिला. जवळपास महिनाभरानंतर मृतदेह वर आला आणि ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोस्टमार्टेम अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली.या अमानुष कृत्यात पतीची हत्या करणाऱ्या पत्नी आणि सख्ख्या भावाबाबत गावात मोठा संताप उसळला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.