Fadnavis government postpones state marathi film award amid pahalgam terror attack in marathi


पहलगाम येथे घडलेल्या या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेत 25 एप्रिल रोजी होणारा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहोळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

State Marathi Film Awards : मुंबई : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अजूनही काश्मीरमध्ये अडकले असून त्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (fadnavis government postpones state marathi film award amid pahalgam terror attack)

पहलगाम येथे घडलेल्या या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेत 25 एप्रिल रोजी होणारा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहोळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सर्व पुरस्कारांचे वितरण एन.एस.सी.आय. डोम येथे एका भव्य समारंभात होणार होते. यासोबतच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, स्वर्गीय राज कपूर, स्वर्गीय व्ही.शांताराम जीवन गौरव आणि ‘विशेष योगदान पुरस्कार 2024’ पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात येणार होते. या पुरस्कार सोहळ्याची नवीन तारीख यथावकाश कळवण्यात येईल, असे शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कळविण्यात आलं आहे.

हेही वाचा – Pahalgam Terror Attack : अल्लाहला तरी घाबरा, परिस्थिती वेळीच सुधारा…पाकिस्तानला घरचा आहेर

यंदाचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक तसेच निर्माते महेश मांजरेकर जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाच्या स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना मिळणार आहे. 1993 पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे.

हेही वाचा – Pahalgam Terror Attack : बायका – मुलांना आम्ही कधीच… हल्ल्यानंतर काय म्हणाले दहशतवादी



Source link

Comments are closed.