IPL 2025: फाफ डू प्लेसीसने रचला इतिहास! एबी डिव्हिलियर्सनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) केवळ भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशांतील खेळाडूंनाही त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. सध्या आयपीएलचा 18वा हंगाम आयोजित केला जात आहे. स्पर्धेतील 48वा सामना खेळत (DC vs KKR) फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला आहे. खरंतर, डू प्लेसिस आता आयपीएलमध्ये 150 सामने खेळणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू बनला आहे.

फाफ डू प्लेसिस 2012 पासून आयपीएलचा भाग आहे आणि सध्या तो त्याचा 13वा हंगाम खेळत आहे. डू प्लेसिस आज (29 एप्रिल) आयपीएलमध्ये 150वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याच्या आधी एबी डिव्हिलियर्सने (Ab De Villiers) ही कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 186 सामने खेळले. आता डू प्लेसिस आयपीएलमध्ये 150 सामने खेळणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू बनला आहे. डेव्हिड मिलरचे (David Miller) नाव या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत 140 सामने खेळले आहेत.

40 वर्षीय डू प्लेसिसने 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 2025च्या आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचे (DC) प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत, डू प्लेसिस एकूण 4 संघांकडून खेळला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 150* सामन्यांमध्ये, फाफ डू प्लेसिसने 35.67च्या सरासरीने 4,674 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याच्या बॅटमधून 38 अर्धशतके निघाली आहेत. 96 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

Comments are closed.