एजबेस्टनमधील पराभवानंतर इंग्लंडच्या माजी दिग्गजांचा बेन स्टोक्सवर संताप, जाणून घ्या काय म्हणाले?

माजी कर्णधार मायकेल आथर्टन (michael Atherton) यांनी एजबेस्टनमध्ये दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला भारताकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर म्हटलं की, बेन स्टोक्सच्या (Ben Stocks) फलंदाजीची कामगिरी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घसरत चालली आहे. तेही तेव्हाच, जेव्हा इंग्लंड संघाला टीकेला सामोरे जात असताना त्याने पुढे येऊन नेतृत्व करायला हवे होते.

आथर्टन यांच्या मते, कर्णधार म्हणून तीन वर्षांच्या कारकिर्दीत भारताविरुद्धची ही मालिका स्टोक्सच्या नेतृत्व क्षमतेची सर्वांत मोठी परीक्षा आहे. स्टोक्सने आपल्या 13 शतकांपैकी शेवटचं शतक दोन वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर अॅशेसदरम्यान ठोकलं होतं. आता तो गुरुवारपासून लॉर्ड्सवर भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरेल.

आथर्टन यांनी द टाइम्ससाठी आपल्या कॉलममध्ये लिहिलं आहे की, सतत सामने खेळणं, कमी विश्रांती, मोठ्या पराभवांनी आणि वाईट निर्णयांनी त्याच्या समस्या वाढवल्या आहेत. त्यात त्याच्या फलंदाजीतील फॉर्मची घट वर्षागणिक दिसत आहे.

इंग्लंडसाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळलेला हा माजी सलामीवीर पुढे म्हणाला, फक्त एकच स्वरूप खेळणारा खेळाडू जो कसोटी व्यतिरिक्त फारसा क्रिकेट खेळत नाही. कधीकधी आपल्या मर्जीने अशा वेळी लय आणि फॉर्म गमावतो, जेव्हा खरंतर त्याने पुढाकार घ्यायला हवा आहे.

आथर्टन यांनी हेही नमूद केलं की, भारतीय कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) स्टोक्सच्या उलट फिरकीपटूंचा सहज सामना केला आहे. ते म्हणाले, स्टोक्स फिरकीविरुद्ध अस्थिर दिसला, तर गिलने प्रभुत्व गाजवलं. या मालिकेत गिलचे पुनरागमन जबरदस्त झाले आहे आणि एजबेस्टनमधील विजय त्याच्या दूरदृष्टी आणि निर्धारामुळे साध्य झाला.

आथर्टन पुढे म्हणाले, इंग्लंडकडे गिलच्या स्टंपला लक्ष्य करण्याची, चेंडू त्याच्या पॅडवर मारण्याची योजना होती, पण तो तसा बाद होईल असं अजिबात वाटलं नाही.

जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि गस एटकिन्सन (Gus Atkinson) हे दोघंही दुखापतीतून सावरल्यानंतर पुरेसं लाल चेंडूचं क्रिकेट खेळलेले नाहीत, पण आथर्टन यांच्या मते या दोघांना लॉर्ड्समध्ये खेळायला हवं. 2019 मध्ये स्टीव स्मिथला (Steve Smith) रोखण्यासाठी लॉर्ड्सवर आर्चरला बोलावलं गेलं, तेव्हा त्याने कसोटी क्रिकेट खेळलेलं नसतानाही आपल्या खेळाच्या सर्वोच्च पातळीवर कामगिरी केली होती.

Comments are closed.