OUT की नॉट आउट… भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा राडा: फखर जमान भडकला, हार्दिकच्या चेंडूवर संजू

फखर झमान कॅच विवाद इंड. पाक सुपर 4 एशिया कप 2025: आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (21 सप्टेंबर) दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगला. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला. डावखुऱ्या झमाननं 9 चेंडूत तीन चौकारांसह 15 धावा केल्या. तो चांगल्या लयीत फलंदाजी करत असतानाच तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने त्याला आऊट केले. विकेटकीपर संजू सॅमसननं फखर जमानचा कॅच पकडला.

OUT की नॉट आउट… भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा राडा

हार्दिकनं टाकलेला चेंडू मंद गतीचा होता. झमानच्या बॅटचा कडा लागून चेंडू मागे गेला. वेग कमी असल्यामुळे चेंडू संजूपर्यंत पोहोचेपर्यंत तो जमिनीच्या अगदी जवळ आला होता. सॅमसननं तो कॅच घेतला, पण तो पकडला की जमिनीला लागला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यामुळे मैदानावरील पंच गाझी सोहेल यांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. थर्ड अंपायर रुचिरा पल्लियागुरुगे यांनी रिप्ले पाहिल्यानंतर जमानला बाद ठरवलं.

झमान आणि प्रशिक्षक हेसनची नाराजी

निर्णयानंतर फखर जमान नाराज दिसला. तो पॅव्हेलियनकडे परतताना पंचांच्या निर्णयावर असमाधान व्यक्त करत होता. पाकिस्ताननं 21 धावांवर पहिला विकेट गमावला. झमान ड्रेसिंगरूममध्ये परतल्यानंतर त्यानं मुख्य प्रशिक्षक माईक हेसनशी चर्चा केली. हेसनदेखील या निर्णयामुळे नाराज असल्याचं स्पष्ट दिसलं.

साम अयूबच्या जागी सलामीसाठी उतरलेल्या फखर जमाननं दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहच्या चेंडूंवर दोन चौकार मारले. त्यानंतर पुढील षटकात हार्दिकच्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने चौकार ठोकला. पण लगेचच तो बाद झाला. या स्पर्धेतल्या चार सामन्यांत फखर जमाननं 35 च्या सरासरीनं आणि 138.15 च्या स्ट्राईक रेटनं 105 धावा केल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातविरुद्धचं त्याचं सर्वोच्च स्कोर 50 धावा ठरलं आहे.

हे ही वाचा –

Sahibzada Farhan Firing Style celebration : भर मैदानात पाकिस्तानी खेळाडूकडून फायरिंग स्टाईल सेलिब्रेशन, 2 जीवदान अन् टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई, व्हिडिओ व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.