दिल्लीहून उड्डाण करणाऱ्या विमानांना खोटा इशारा
सरकारकडून चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गेल्या आठवड्यापासून दिल्लीतील विमानांना जीपीएस सिग्नलवर चुकीचे अलर्ट मिळत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. याला ‘जीपीएस स्पूफिंग’ असेही म्हणतात. स्पूफिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला असून ते नेव्हिगेशन सिस्टमची दिशाभूल करण्यासाठी बनावट जीपीएस सिग्नल पाठवतो. युद्धक्षेत्रात शत्रूचे ड्रोन आणि विमाने नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. वैमानिकांना बनावट लोकेशन आणि नेव्हिगेशन डेटा अलर्ट मिळाल्यामुळे उ•ाण आणि लँडिंगवर परिणाम होत आहे. हवाई वाहतूक नियंत्रण सूत्रांनुसार, दिल्लीच्या सुमारे 100 किमीच्या परिघात अशा घटना घडल्या आहेत. यासंबंधी आता फ्लाइट रेग्युलेटर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला (डीजीसीए) माहिती दिल्यानंतर केंद्र सरकारकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Comments are closed.