आसामचे  प्रसिद्ध गायक समर हजारिका यांचे निधन

आसामचे संगीतकार आणि गायक समर हजारिका यांचे मंगळवारी गुवाहाटी येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. ते काही काळापासून आजारी होते. रुग्णालयातून घरी आले होते. निजारापार भागातील त्यांच्या घरी निधन झाले. समर हे भारतरत्न भूपेन हजारिका यांचे धाकटे बंधू होत. ते दहा भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्यांनी रेडिओ, अल्बम आणि चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली आणि संगीतही दिले. 1960च्या दशकात  त्यांचा पहिला अल्बम ‘उत्तर कोंवर प्रोतिमा बरुआ देवी’ 1968मध्ये प्रदर्शित झाला होता. अल्बम व्यतिरिक्त, त्यांनी आसामी चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणूनही काम केले. त्यांनी ‘उपोपथ’, ‘बोवारी’ आणि ‘प्रवती पोखिर गान’ यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली.

Comments are closed.