ट्रेंड -दैव बलवत्तर म्हणून बचावले

टेक्सासमध्ये प्रसिद्ध यूटय़ुबर फूड व्लॉगिंग करताना एक धक्कादायक प्रकार घडला. त्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यूटय़ुबर आणि फूड इन्फ्लुएन्सर नीना सँटियागो आणि तिचा सहकारी कंटेंट क्रिएटर पॅट्रिक ब्लॅकवुड हे टेक्सासमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसले होते. नीना आणि पॅट्रिकने बर्गरची माहिती देऊन त्याचा पहिला घास तोंडात टाकला आणि तेवढय़ात एक एसयूव्ही येऊन त्यांच्या बाजूच्या भिंतीला आदळली. गाडीच्या धडकेने नीना आणि पॅट्रिक टेबलावरून काहीसे बाजूला फेकले गेले. खिडकीच्या काचा त्यांच्या अंगावर पडल्या. यात दोघेही जखमी झाले. हा धक्कादायक व्हिडीओ ‘नीना अनरेटेड’ या इन्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या अपघातानंतर हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱयांनी लगेचच आम्हाला मदत केली, याबद्दल नीना आणि पॅट्रिकने आभार मानले.
Comments are closed.