हरियाणात प्रसिद्ध मॉडेल शीतल हत्या
सोनीपत:
हरियाणाच्या सोनिपत येथे खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. हरियाणवी संगीतक्षेत्रात कार्यरत शीतल नावाच्या मॉडेलची गुंडांनी गळा चिरून हत्या केली आहे. मॉडेलचा मृतदेह एका कालव्यात सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. मॉडेल शीतल ही पानिपत येथील रहिवासी होती आणि काही दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रारही नोंदविली होती. तिच्या मारेकऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. 23 वर्षीय शीतल हरियाणवी अल्बममध्ये मॉडेल म्हणून काम करत होती. 14 जून रोजी ती चित्रिकरणासाठी घराबाहेर पडली होती, ज्यानंतर ती परतली नव्हती असे तिची बहिण नेहाने सांगितले. शीतलच्या हत्येप्रकरणी सोनिपत पोलीस आणि पानिपत पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत.
Comments are closed.