कोकण विभागाच्या उपसंचालक अर्चना गाडेकर-शंभरकर यांचे निधन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर ( 52 ) यांचे दीर्घ आजाराने आज अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे
मूळच्या चंद्रपूरच्या असणाऱया अर्चना शंभरकर या प्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांची ’सोलमेट’ ही कादंबरी तर ‘सारीनास’ हा लघुकथा संग्रह प्रसिद्ध झाला होता. विदर्भातील सुप्रसिद्ध कवियित्री दिवंगत विमल गडेकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. माहिती आणि जनसंपर्क खात्यात आपल्या कार्याने त्यांनी आपला ठसा उमटवला होता. शंभरकर यांच्या पार्थिवावर उद्या नवी मुंबई खारघर येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Comments are closed.