…याला म्हणतात नशीब! सामना पाहण्यासाठी आलेला चाहता काही सेकंदात झाला लखपती, नक्की घडलं काय? पा

डर्बन सुपर जायंट्स वि प्रिटोरिया कॅपिटल्स SA20 2025 : सध्या दक्षिण आफ्रिकेत SA20 लीग खेळली जात आहे. ज्यामध्ये डर्बन सुपर जायंट्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. डर्बन सुपर जायंट्सने हा सामना 2 धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान, स्टेडियममध्ये बसलेल्या एका चाहत्याने असा एक अद्भुत झेल घेतला, चाहत्याच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि सर्वत्र चर्चेत आहे. ज्यामुळे त्याचे नशीब काही सेकंदात चमकले.

खरंतर, SA20 लीग दरम्यान डर्बन सुपर जायंट्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात केन विल्यमसनची शानदार खेळी पाहायला मिळाली. फलंदाजी करताना विल्यमसनने एक गगनचुंबी षटकार मारला, जो स्टँडमध्ये बसलेल्या एका चाहत्याच्या हातात गेला. चाहत्याने हा झेल एका हाताने घेतला. खरं तर, SA20 लीग दरम्यान जर एखाद्या चाहत्याने मैदानाबाहेर एका हाताने चेंडू पकडला तर त्याला 90 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. आता चाहत्याने घेतलेल्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विल्यमसनची तुफानी खेळी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डर्बन सुपर जायंट्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 209 धावा केल्या. या सामन्यात डर्बन सुपर जायंट्सकडून फलंदाजी करताना केन विल्यमसनने 40 चेंडूत 60 धावांची नाबाद सर्वाधिक खेळी केली.

त्याच्या खेळीदरम्यान, विल्यमसनने 3 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले. हा सामना जिंकण्यासाठी डर्बन सुपर जायंट्सने प्रिटोरिया कॅपिटल्ससमोर 210 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना प्रिटोरिया कॅपिटल्सना 20 षटकांत 6 गडी गमावून फक्त 207 धावा करता आल्या आणि डर्बन सुपर जायंट्सने 2 धावांनी सामना जिंकला.

हे ही वाचा –

Harbhajan Singh : ‘हाथी चले बजार पालतू कुते भौंके हजार…’ हरभजन सिंगच्या टार्गेटवर नक्की कोण? सोशल मीडियावर खळबळ

Hardik Pandya : कसोटीनंतर हार्दिक पांड्याचा ODI संघातून होणार पत्ता कट? जाणून घ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य प्लेइंग-11

अधिक पाहा..

Comments are closed.