'तू खेळला नाहीस तर टेस्ट पहाणार नाही!', चाहत्याच्या विनंतीनंतर पहा विराटची प्रतिक्रीया

भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने सोमवारी (12 मे) रोजी कसोटीतून निवृत्ती घेतली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (Virat Kohli Retired From Test Cricket) विराट वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी कसोटीतून निवृत्त झाला. त्यामुळे अनेक चाहते, अनेक दिग्गज क्रिकेटपटू, क्रिकेट तज्ञ विराटवर नाराज झाले आहेत. विराटचा फिटनेस पाहता तो आणखी 3-4 वर्षा कसोटी क्रिकेट खेळू शकला असता. अशा प्रतिक्रिया येत होत्या. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चाहता विराटला म्हणतोय की, तू खेळला नाहीत तर कसोटी क्रिकेट पाहणार नाही.

खरंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईच्या विमानतळावर दिसले. यादरम्यान एक चाहता विराटला म्हणाला. तुम्ही खेळला नाहीस तर आम्ही कसोटी क्रिकेट पाहणार नाही. आम्ही तुमच्यासाठीच कसोटी क्रिकेट पाहत होतो. पण आता तुम्ही निवृत्ती घेतली. आम्ही तुमची वनडे क्रिकेट खेळण्याची वाट पाहू.

36 वर्षीय कोहलीने 123 सामन्यांच्या 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये कोहलीने 30 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत. विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये (वनडे, कसोटी आणि टी20) 550 सामन्यांमध्ये 82 शतके केली आहेत. तो वनडे सामन्यात सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे, त्याच्या नावावर या फॉरमॅटमध्ये 51 शतके आहेत.

Comments are closed.