अहिल्यानगरमध्ये कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, आठवडाभरातील दुसरी घटना

कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली. नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथे ही घटना असून गेल्या आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे. नानासाहेब केशव ठोंबळ (49) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याआधी 17 ऑगस्ट रोजी वडूले येथील बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याने विष घेवून आत्महत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानासाहेब ठोंबळ यांनी वाढत चाललेला कर्जाचा डोंगर आणि कपाशीसाठी खत आणि औषधे घ्यायला पैसे नसल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले. शेतकरी आत्महत्येमुळे नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. नानासाहेब ठोंबळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार आहे.
Comments are closed.