‘शेतकऱ्याला मारलं आणि तुम्ही ‘त्या’ नेत्याची पुन्हा नियुक्ती करत आहात’, रोहित पवारांचा अजितदाद
सांगली : विधीमंडळाच्या सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारणाऱ्या सूरज चव्हाण यांचे महिन्याच्या आतच राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यावरून अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. अशातच आमदार रोहित पवार यांनी आम्ही अजितदादांच्या काळजीपोटी बोललो आहोत, कोणतीही टीका केली नाही, असं म्हटलं आहे.
कुठल्या नियुक्ती करायला काही हरकत नाही. पण शेतकऱ्याला मारलं आणि तुम्ही त्या नेत्याला पुन्हा नियुक्ती करत आहात. सोशल मीडिया वरून तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त झाला, ते पाहता नियुक्ती झाली की नाही, हे माहीत नसेल म्हणून काळजीपोटी आम्ही बोललं आहेत. आम्ही दादांच्या काळजीपोटी बोललो आहोत, कोणतीही टीका केली नाही, असंही ते पुढे म्हणालेत.
दादांनी टेस्ट, 50 ओव्हरची मॅच खेळली आताचा काळ टी20चा
इस्लामपूरमधील अजित पवारांच्या भाषणावरती प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, अजितदादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषण केलं. आम्ही आमच्या स्टाईलमध्ये भाषण केलं. दादांनी टेस्ट, 50 ओव्हरची मॅच खेळले आताचा काळ टी20 चा आहे. आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी डायरेक्टर टी20 मध्ये आलो आहे, जशी टूर्नामेंट तसे खेळतो. आमच्याकडे अनेक दिग्गज नेते आहेत, पण त्यांचेकडे तुलना केली तर पलीकडे अनुभवी नेते जास्त आहेत. शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मॅच खेळत आहोत, एखाद्या बॉलवर आम्ही सिक्स मारला,चांगलं खेळलो तर सामान्य जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमच्या टीमला जिंकण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे खेळत आहोत. खूप सारे नेते जरी नसले तरी प्रामाणिक नेते आणि कार्यकर्त्यांसोबत आम्ही बेधडक लढत आहोत, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
ईव्हीएम मशीनबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, 90 मतदार संघ असे आहेत, बॅलेट पेपरवर आमचे आमदार निवडून आले आहेत, पण ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे,आणि काय गडबड झाली आहे ते राहुल गांधी यांनी पुढे आणलेले आहे. माझ्या विरोधात एवढी ताकद लावून सुद्धा जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आहे आणि मी शांत बसणार नाही. 1200 मतांनी का असेना निवडून आलो आहे, कदाचित 1 लाख 20 हजारांनी आलो असतो, पुढची पाच वर्ष सरकारच्या नाकात दम आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही लहान आहोत, ते फार अनुभवी आहेत, या काळामध्ये युवांनी फार काही बोलायचं नाही, युवांनी काय करायचं कार्यकर्ता म्हणून काम करायचं, सतरंज्या उचलायच्या नेत्यांची थोडीफार मदत करायची, या काळातून ते आले असावेत. पण आजच्या काळात युवा 60 ते 70% आहेत.आज युवा जे बोलतात ते नेत्यांनी ऐकायची तयारी ठेवली पाहिजे आणि युवा म्हणून आम्हाला बालिश समजत असाल तर कुठेतरी मतदार पण बालीश आहे, असं समजायचं का? असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
या जिल्ह्यामध्ये अनेक नेते होऊन गेलेले आहेत, पण आत्ताच्या काळामध्ये इथले नवीन नवीन आमदार आहेत. ते एका बेन्टेक्स सोन्याप्रमाणे, जसं खोटं सोनं असतं, तसं खालच्या पातळीला जाऊन मोठ्या नेत्यावर टीका करत आहेत. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे आणि आरएसएसचे प्रामाणिक राहिले आहेत आणि ते त्या पक्षाबरोबर राहिले ते मोठे नेते आहेत त्यांना विनंती केली आहे तुम्ही बेन्टेक्सच्या सोन्याला सांभाळा, असंही ते म्हणालेत.
आणखी वाचा
Comments are closed.