वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा काळे झेंडे दाखवून कोल्हापूरात निषेध; शेतकरी कर्जमाफीवरून शेतकरी अजूनही संतप्त

शेतक-यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी तसेच वादग्रस्त ठेकेदार धार्जिणा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी अजुनही शेतकरी महायुती सरकार विरोधात आपला रोष व्यक्त करत आहेत.आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना हातकंणगले नजीक काळे झेंडे दाखविण्यात आले. कोल्हापूरहून जयसिंगपूर येथे माजी मंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांच्या निवासस्थानी जात असताना स्वा. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने त्यांना काळे झेंडे दाखविले.
राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असून,दररोज सरासरी 10 शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारने संपुर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते.पण आता कर्जमाफी करता येणार नाही असे ते वक्तव्य करत आहेत.तसेच एकीकडे राज्य सरकारकडे शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी 86 हजार कोटी रूपये आहेत,पण राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी करण्यास पैसे नसल्याचे सोंग केले जात आहे.
शिवाय सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी-नागपूर महामार्ग हा समांतर असूनही शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग रेट्यात येत आहे. निवडणुकीपुर्वी हा मार्ग होणार नसल्याचा दिलेला शब्द आता फिरवण्यात आल्याने,पुन्हा शेतकरी आक्रमक झाले आहेत.शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली व कोल्हापूर जिल्हयाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकार कशासाठी अट्टाहास करत आहे ? असा सवाल करत,संतप्त झालेल्या स्वा.शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना काळे झेंडे दाखवले.तसेच महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी देत,निषेध करण्यात आला.दरम्यान या घटनेनंतर जयसिंगपूर व हातकंणगले पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यासाठी शोधमोहिम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
Comments are closed.