डोंबिवलीत रंगाचा बेरंग, रंगाचा फुगा लागल्यानं वाद, तरुणावर धारधार शस्त्रानं जीवघेणा हल्ला
Dombivli Crime News : देशभरात होळीसह धुळवडची सण उत्साहात सुरु असतानाच डोंबिवलीत (Dombivli ) रंगाचा बेरंग करणारी घटना समोर आली आहे. होळी खेळताना रंगाचा फुगा तरुणाला लागल्याने त्या तरुणाने फुगा मारणाऱ्या 17 वर्षीय तरुणावर धारदार वस्तुने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील यशवंत काम्प्लेक्स परिसरात घडली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय हर्ष कांबळे याच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रणय जाधव असे हल्लेखोर तरुणाचं नाव आहे.
नेमकी कशी घडली घटना?
हर्ष कांबळे हा गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास डोंबिवली पूर्वेडील सागाव येथील यशवंत काम्प्लेक्स परिसरात मित्रांसोबत होळीनिमित्त रंगाचे फुगे एकमेकांवर फेकून होळीचा आनंद साजरा करत असतानाच यशवंत काम्प्लेक्समधील प्रणय हा तरुण या मौजमजेत सहभागी न होता तो लांबून बघत होता. तर दुसरीकडे रंगाचे फुगे मित्र एकमेकांवर फेकत होते. त्यावेळी एक फुगा अल्पवयीन तक्रारदार तरुणाकडून चुकून बाजुला उभ्या असलेल्या प्रणयच्या अंगावर जाऊन पडला. त्यावेळी बाजुला उभा असलेला यशवंत काम्प्लेक्स मधील तरुण साई विधी सोसायटीतील तरुणाच्या अंगावर जाब विचारण्यासाठी आला. त्याने तू आपल्या अंगावर रंगाचा फुगा का फेकला, असे प्रश्न करत अल्पवयीन हर्षला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने मारहाण केली. तसेच त्याचा टी शर्ट पकडून त्याला शंकेश्वर शाळेजवळील अंधार असलेल्या कोपऱ्यात जबरदस्तीने नेले. तेथे त्याच्या हाताच्या दंडावर धारदार वस्तुने मारुन गंभीर जखमी केले. दरम्यान या घटनेमुळं परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आज देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा
आज देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत, आज सर्वजण होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. होळीच्या या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय देशभरातील विविध सेलिब्रिटी होळीच्या शुभेच्छा देत आहेत. यावेळी होळीसोबतच रमजानच्या जुम्माच्या नमाजचा दिवसही आहे. यामुळे देशातील विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मात्र, होळीच्या सणाच्या या उत्सवात डोंबिवलीमध्ये तरुणावर धारदार वस्तुने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
महत्वाच्या बातम्या:
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू
अधिक पाहा..
Comments are closed.