बाप आपल्याच मुलीला मारतो

लेकीने दोन दिवसांपूर्वीच व्हिडीओतून घातपात होण्याची शक्यता वर्तविली

ग्वाल्हेर
पोटच्या लेकीचा विवाह अवघ्या चार दिवसांवर आला असताना बापानेच लेकीचा जीव घेतल्याची भयावह घटना ग्वाल्हेर येथे घडली आहे. हळद लागण्यापूर्वीच निर्दयी बापाने आपल्या २० वर्षीय लेकीची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजता आदर्श नगर महाराजपुर येथे घडली. चार दिवसांनी १८ जानेवारीला मुलीचे लग्न होणार होते. दरम्यान वादावादीतून वडिलांनीच लेकीचा जीव घेतला. हत्याकेल्यानंतर वडील १० मिनीट पिस्तूल फिरवत राहीला होता. या घटनेची माहिती मिळताच ग्वाल्हेर एस पी धरमवीर सिंग आणि सीएसपी महाराजपुरा येथील घटनास्थळी पोहोचले. खुनाच्या आरोपींमध्ये मुलीच्या चुलत भावाच्याही समावेश आहे. घटनास्थळाहून मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे तर चुलत भाऊ राहुल फरार आहे.

महाराजपुरा आदर्शनगर येथील रहिवासी तनु गुर्जर (वय २०) हीचे वडील महेश सिंह महामार्गावर महेश ढाबा चालवतात. तनुच्या लग्नाची तयारी सुरु होती. दरम्यान महेश मंगळवारी रात्री घरी आल्यावर रागाच्या भरात तनुच्या तोंडावर पिस्तुलाने गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकल्यावर घरातील सदस्यांनी खोली धाव घेतली, तोपर्यंत तनुचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेनंतर महेश पिस्तुल घेऊन उभा होता तर तनुचा चुलत भाऊ राहुलही पिस्तुल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली.
या घटनेची माहिती शेजारच्यांनी पोलिसांना दिली. पोलिस त्वरीतच घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत महेश पिस्तुल फिरवत तेथेच होता. आरोपी वडील महेश सिंह यांना अटक करण्यात आली आहे तर चुलत भाऊ राहुल फरार असल्याची माहिती सीएसपी नागेंद्र सिंह सिकरवार यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी मुलीने केला एक व्हिडीओ, काय होतं त्या व्हिडीओमध्ये….
नमस्कार, माझे नाव तनु गुर्जर आहे. माझ्या वडिलांचे नाव महेश गुर्जर आहे, माझ्या आईचे नाव ममता गुर्जर आहे. मी आदर्श नगर येथे राहते. मला तुम्हाला सांगायचे आहे की, माझे एक मुलावर प्रेम आहे. त्याचे नाव भिकम मावई आहे. तो आग्रा येथील रहिवासी आहे. आमच्या नात्याला सहा वर्षे झाली आहेत. सुरुवातीला माझ्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला होता, पण नंतर त्यांनी नकार दिला. आता ते मला रोज मारतात. माझा मृत्यू झाला किंवा मला काही झाले तर त्याला माझे कुटुंबिय जबाबदार असतील. ते माझ्यावर रोज दुसऱ्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणत आहेत, पण मी करू शकत नाही.

Comments are closed.