बाप-लेक आमने-सामने; मैदानावर नात्यांपेक्षा क्रिकेट जिंकलं, मुलानेच ठोकला वडिलांना षटकार! VIDEO VIRAL
क्रिकेटच्या मैदानावर अनेक वेळा अनपेक्षित आणि दुर्मिळ क्षण पाहायला मिळतात. असाच एक खास प्रसंग अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या शपागीजा क्रिकेट लीग (SCL) 2025 मध्ये घडला, जेव्हा अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद नबी आणि त्याचा मुलगा हसन ईसाखिल एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले.
मिस ऐनाक नाइट्सकडून खेळणाऱ्या नबीने मंगळवारी (22 जुलै) एमो शार्क्सविरुद्धच्या सामन्यात नवव्या षटकात गोलंदाजीला सुरुवात केली. समोर होता त्याचा 18 वर्षीय मुलगा हसन. नबीने टाकलेला पहिलाच चेंडू हसनने गुडघ्यावर बसून मिडविकेटच्या दिशेने तुफानी षटकार ठोकला. हा क्षण पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले, तर नबी फक्त पाहतच राहिला. हसनचा हा शॉट आणि बाप-लेक यांच्यातला हा सामना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुलाने वडिलांना सहा जणांना मारहाण केली.
– हसन आयशाखील यांनी त्याचे वडील मोहम्मद नबी यांचे सहा सह स्वागत केले. 😄pic.twitter.com/2t1gzzxkzq
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 22 जुलै, 2025
हसनने एमो शार्क्सकडून सलामीवीर म्हणून खेळताना 36 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. हसनच्या खेळीच्या जोरावर एमो शार्क्सने 162 धावांचं लक्ष ठेवलं. मात्र, मिस ऐनाक नाइट्सने केवळ 17 षटकात 168 धावा करत 5 विकेट्सनी विजय मिळवला. या विजयात ओपनर खालिद तानिवाल (56 धावा) आणि वफीउल्लाह तराखिल (49 धावा) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
40 वर्षीय मोहम्मद नबी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर वनडेमधून निवृत्त होण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. नबीने फेब्रुवारीमध्ये आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मुलासोबत अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. नबीने आतापर्यंत 3 कसोटी, 173 वनडे आणि 132 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
क्रिकेटच्या इतिहासात फारच कमी वेळा बाप आणि मुलगा एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात, आणि SCL 2025 मधील हा क्षण त्या दुर्मिळ आठवणींपैकी एक ठरला आहे.
Comments are closed.